लग्नासाठी ५० तर अंत्यविधिसाठी २० जणांना परवानगी 

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर)- केंद्र आणि राज्य सरकारने पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊन बाबत धोरण घोषीत केल्यानंतर रात्री जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी पूर्वीच्या धोरणात काही प्रमाणात बदल करून लग्न कार्यासाठी ५० जणांना परवानगी दिली असून अंत्यविधीसाठी २० जणांना परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी केवळ १० जणांना परवानगी होती. दुसरीकडे आदेशामध्ये सलून दुकान बंदचे आदेश होते मात्र सलून दुकान पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले तर आजपासून दुचाकीवर एक व्यक्ती, तीन आणि चारचाकीवर तीन व्यक्ती प्रवास करू शकणार आहेत, नसता त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 
   लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात बीड जिल्हाधिकार्‍यांनी रात्री आपले धोरण जाहीर केले आहे. यापूर्वीच्या धोरणात अल्पशा बदल जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केला असून पूर्वी विवाहा कार्यासाठी केवळ १० जणांना परवानगी देण्यात येत होती आता मात्र विवाह कार्यासाठी ५० जणांना परवानगी देण्यात येत असून अत्यंविधीसाठी २० जणांना परवानगी दिली जाणार आहे. सलूनच्या दुकाना पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचे सांगून दुचाकीवर केवळ एकालाच प्रवास करता येणार आहे. तीन चाकी आणि चारचाकी गाड्यांमध्ये चालकांसह केवळ दोन प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. बसमध्ये ५० टक्के प्रवासी सोशल डिस्टन्स पाळून प्रवास करू शकणार असून जिल्हाबाहेरील बस सेवेला अद्यापपर्यंत परवानगी देण्यात आलेली नाही. सर्व दुकाना पूर्वीप्रमाणेच सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेसहापर्यंत सुरू राहणार असून केन्टेंटमेंट झोनमधील जीवनावश्यक वस्तूंना परवानगी देण्यात आली आहे. आरोग्य सेतू ऍपचा वापर करण्याचे आवाहन या आदेशात काढण्यात आले असून रात्री सातनंतर सकाळी सात वाजेपर्यंत कडेकोट संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मास्क वापरणे, सार्वजनिक ठिकाणी सहा फुटाचे अंतर राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. पाचपेक्षा जास्त व्यक्तींना दुकानदारांनी दुकानात येण्यापासून मज्जाव करावा कारण पाचपेक्षा अधिक व्यक्तींना दुकानात येण्यास प्रतिबंधीत करण्यात आले आहे. 

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like