कोविड योध्द्यावर काळाचा घाला

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर) गेल्या तीन महिन्यापासून रायगड येथे कोविड योध्दा म्हणून कर्तव्य बजावणारे पोलिस कॉन्स्टेबल सतिष बाबासाहेब बेद्रे हे आपल्या पत्नीला गावी बीड येथील मुर्शदपूर येथे सोडण्यासाठी दुचाकीवरून बीडकडे आले असता रात्री ७ वाजता म्हसोबावाडी ता.आष्टी येथे त्यांच्या दुचाकीला ट्रकने जोराची धडक दिल्याने या अपघातात पोलिस कॉन्स्टेबल बेद्रे हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. बेद्रे यांचे अपघाती निधन झाल्याने मुर्शदपूरसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या तीन वर्षापूर्वी मुर्शदपूर येथील सतिष बाबासाहेब बेद्रे हे रायगड येथे पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. गेल्या तीन महिन्यापासून ते कोविड योध्दा म्हणून आपले कर्तव्य बजावत होते. रायगड येथे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ते आपल्या पत्नीला गावी मुर्शदपूर येथे सोडण्यासाठी काल दुचाकीवरून आले असता आष्टी तालुकयातील म्हसोबावाडी येथे काल ७ वाजता एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल बेद्रे यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली. याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मृतदेह कडा येथील रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केला. त्यानंतर आज दि.३० जुन रोजी सकाळी ८.३० वा.मुर्शदपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस कॉन्स्टेबल बेद्रे हे क्रिकेटपटू म्हणून नवगण राजुरी परिसरात परिचीत होते. त्यांच्या अपघाती जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like