१०४ संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी 

eReporter Web Team

उद्या पाच जणांना सुट्टी
बीड (रिपोर्टर) कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणार्‍या बीड जिल्ह्यात काल अचानक पाच जण पॉझिटिव्ह आल्याने आज जिल्ह्यातून तब्बल १०४ संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असून बीडची धाकधुक पुन्हा वाढली आहे. बीड शहरातूनच ८२ स्वॅब पाठवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे उपचार घेत असलेल्या पाच रूग्ण बरे झाले असून त्यांना उद्या सुट्टी देण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या काल दहावर होती. मात्र अचानक पाच जण पॉझिटिव्ह आल्याने बीडकरांच्या चिंतेत वाढ झाली. आज त्या पाच जणांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेवून तब्बल १०४ संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यामध्ये बीड जिल्हा सामान्य रूग्णालयाकडून २० सीसीसी बीड कडून ६२, ग्रामीण रूग्णालय आष्टी १२, उपजिल्हा रूग्णालय केज ७, स्वारातील ग्रामीण वैद्यकी महाविद्यालय अंबाजोगाई ३ संशयीतांचा समावेश आहे. काल पाच जण पॉझिटिव्ह निघाल्याने आज १०४ मध्ये काय होते? याबाबत शहरात चिंता व्यक्त केली जात असली तरी दुसरी आनंदाची बाब म्हणजे जे कोरोना बाधीत उपचार घेत होते. त्यामध्येही बरे होण्याची संख्या वाढत आहे. उद्या आणखी पाच जणांना सुट्टी देण्यात येणार आहे. त्यामुळे उपचार घेणार्‍यांची संख्या दोन अंकावरच राहिल.


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like