स्वाराती समावेत राज्यातील अठरा वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केला शासनाचा निषेध

eReporter Web Team

अंबाजोगाई (रिपोर्टर)

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय समावेत राज्यातील ईतर अठरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मधील मागील पंधरा ते वीस वर्षा पासून वर्ग चार बदली कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचारी यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत समावून न घेता कंत्राट पद्धतीने कामगार उपलब्ध करून घेण्याचे आदेश राज्य सरकारने पारित केल्याने आज सरकारच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी येथील स्वा रा ती वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय समावेत राज्यातील ईतर अठरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज बदली कर्मचारी वर्ग चार व कायमस्वरूपी कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू केले आहे कर्मच्यांच्या आंदोलनास नर्सेस फेडरेशन ने राज्य भरात पाठींबा दिला आहे या बाबत राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने प्रसिद्धस दिलेल्या पत्रकात नमूद केले होते की महाराष्ट्र राज्यातील अठरा शासकीय रुग्णालय व महाविद्यालयात साध्य नऊशे बावीस बदली कर्मचारी कार्यरत आहेत हे कर्मचारी मागील पंधराते वीस वर्षा पासून रुग्ण सेवा करत आहेत या कर्मचारी वर्गाने अनेकवेळा आपल्याला शासकीय सेवेत कायम स्वरूपी करण्यात यावे अशी मागणी अनेक वेळा सरकार दरबारी केली आहे अनेक वेळा आंदोलन देखील केले आहे तसेच उच्च न्यायालयाने ने देखील या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत तसेच राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन खात्याच्या सचिव व संचालक यांनी देखील बदली कर्मचारी वर्ग चार यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत समावून घेण्याचे तोंडी आश्वासन महासंघाच्या पदाधिकारी यांना अनेकवेळा झालेल्या बैठकीत दिले होते सध्या महाराष्ट्र राज्यात व देशात कोविड19 महामारीचे फैलाव अत्यन्त वेगाने होत असल्याने राज्य सरकारने खबरदारी म्हणून राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच आरोग्य खात्यातील सर्व रुग्णालयातील सर्व प्रकारच्या रिक्त जागा सरळ सेवा भरती पद्धतीने भरण्याची मुभा स्थानिक पातळीवर दिली आहे मात्र राज्य एक, मंत्रालय एक, खाते मात्र दोन आरोग्य खात्याचे मंत्री राजेश टोपे यांनी वर्ग एक ते वर्ग चार पर्यंतच्या सर्व जागा सरळ सेवा पध्दतीने भरण्याचे आदेश देऊन बदली कर्मचारी यांना कायमस्वरूपी सेवेत समावून घेण्याचे आदेश दिले आहेत तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन खात्याच्या मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांनी स्पष्टपणे दुजभाव करून वर्ग एक ते वर्ग तीन पर्यंतच्या रिक्त जागा सरळ सेवा पद्धतीने तर वर्ग चार च्या तीन हजार सहाशे पेक्षा जास्त रिक्त जागा कंत्राट पद्धतीने भरण्याचे आदेश पारित करून दुजभाव केला आहे यामध्ये जर वर्ग चार चे रिक्त पदे कंत्राट पद्धतीने भरण्याचा मानस शासनाने केला असता तर आरोग्य विभागात देखील वर्ग चारची पदे कंत्राट पध्दतीने भरण्याचे आदेश दिले गेले पाहिजे होते ऐकीकडे वर्ग चार साठी सरळ सेवा भरती तर दुसरीकडे वर्ग चार साठीच कंत्राट पद्धत का हा मोठा प्रश्न साध्य निर्माण झाला तसेच राज्य भरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ओ पे डी चोवीस तास सुरू ठेवण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री ना अमित देशमुख आदेश काल पारित केले तसेच त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग व त्यावरील अपेक्षित खर्च याचा प्रस्ताव तात्काळ शासना कडे पाठवण्यात यावा असे देखील आदेशात केले आहे म्हणून व शासनाने रिक्त जागा भरण्याची कार्यवाही सुरू केल्याने अनेक वर्षांपासून दर महिना 29 दिवस काम करणाऱ्या बदली कर्मचारी वर्ग चार यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी करण्यात यावे या मागणीसाठी व शासनाने सध्या घेतलेल्या धोरणा विरुद्ध राज्य सरकारी कर्मचारी महासंघाणे आंदोलन करण्यासाठी रणशिंग फुंकले होते त्यानुसार दि 30 जून ते दि 2 जुले पर्यंत काळ्या फीत लावून हे कर्मचारी काम करणार असून आज येथील स्वा रा ती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बदली कर्मचारी व कायमस्वरूपी कर्मचारी वर्ग चार यांनी शासनाचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती लावून आंदोलनाला सुरवात केले आहे तर दि 3 जुलै ते 5 पर्यंत दोनतास कामबंद आंदोलन करणार आहे तर दि 7 जुलै रोजी महासंघाचे साडेतीन लाख कर्मचारी एकदिवस कामबंद आंदोलन करून धरणे देणार आहेत अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कायमस्वरूपी वर्ग चार कर्मचारी यांची संख्या वीस टक्के तर बदली कर्मचारी यांची संख्या ऐशी टक्के आहे आणि कायमस्वरूपी वर्ग चार हे कर्मचारी महासंघाचे सदस्य असल्याने तसेच राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कर्मचारी महासंघाचे सदस्य असल्याने आंदोलनाचा मोठा फटका कोविड19 मुळे भयभीत झालेल्या जनतेला बसणार असून आज सकाळी कर्मचारी महा संघाचे राज्य संघटक आर पी पंचाल येथील अध्यक्ष दीपक कांबळे तसेच दिलीप गालफाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरवात करण्यात आले आहे


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like