चक्रीवादळाच्या अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे नुकसान झालेल्या उर्वरित आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना 71 कोटी 88 लक्ष रुपये मदत- पालकमंत्री धनंजय मुंडे

eReporter Web Team

चक्रीवादळाच्या अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे नुकसान झालेल्या उर्वरित आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना 71 कोटी 88 लक्ष रुपये मदत- पालकमंत्री धनंजय मुंडे

ऑनलाईन रिपोर्टर 

बीड, दि.30:--जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे आलेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले होते यातील उर्वरित आपद्ग्रस्त बाधित शेतकऱ्यांना विशेष दराने 71 कोटी 88 लक्ष हजार रूपये मदत देण्यास मान्यता देण्यात आली आहे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये "क्यार" व "महा" चक्रीवादळच्या नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अवेळी पावसामुळे राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यांमधील शेतीपिकांचे नुकसान झाल्याने या शेतीपिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने ७३०९ कोटी ३६ लाख रूपये निधी यापूर्वी देखील वितरित केला आहे.

दूसऱ्या टप्प्यात उर्वरित बाधित शेतकऱ्यांना निधी वाटपासाठी शासनाकडे अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली होती. औरंगाबाद विभागास 249 कोटी रुपये निधी मंजूर झाला असून त्यापैकी बीड जिल्ह्यास सर्वात जास्त 71 कोटी रुपये मिळाले आहेत.

हा निधी शेती व बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी मदतीचे वाटप करताना प्रचलित नियमानुसार शेती, बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीकरीता मदत ३३ टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्यांना शेतकऱ्यांना मिळणार असून शेती पिकांसाठी प्रती हेक्टरी 8 हजार रुपये व बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी प्रती हेक्टरी 18 हजार रुपये जास्तीत जास्त 2 हेक्टरसाठी मदतीस मान्यता देण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यातील शासन यंत्रणे मार्फत कृषी सहायक, तलाठी व ग्राम सेवक यांच्या पंचनाम्यानुसार जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांच्या मार्फत शासनास दिलेल्या अहवालानुसार सदर मदतीचे वाटप होणार आहे.

यामध्ये शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदतीची रक्कम कमीत कमी 1 हजार रुपये तसेच बहुवार्षिक पिकांसाठी मदतीची रक्कम कमीत कमी 2 हजार रुपये आहे. संबंधित बाधितांच्या बँक बचत खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. बाधितांना रोखीने किंवा निविष्ठा स्वरुपात मदत करण्यात येऊ नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत ही विशेष बाब असून मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रक्कमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करु नये यासाठी सहकार विभागामार्फत बॅकांना आदेश देण्यात आले आहेत असे पालकमंत्री श्री.मुंडे यांनी सांगीतले.


अधिक माहिती: dhananjay munde

Related Posts you may like