स्वारातीच्या कोवीड केअर हाँस्पिटलमधील कोरोना पाँझिटीव्ह तरुणाचा मृत्यू

eReporter Web Team

अंबाजोगाई - रिपोर्टर
अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोवीड केअर हाँस्पिटलमध्ये गेली आठ दिवसापासून उपचार घेत असलेल्या २८ वर्षीय तरुणाचा आज सायंकाळी मृत्यू झाला.

सदरील तरुण हा उस्मानाबाद जिल्ह्यातील गिरवली येथील रहिवासी असुन तो तेथे ट्रँक्टर चालक म्हणून काम करीत होता. आठ दिवसापुर्वी तो अंबाजोगाई शहरातील आनंदनगर विभागात राहणाऱ्या आपल्या भावाकडे आला होता. येथे आल्यानंतर त्यास सर्दी व श्वसनाचा त्रास सुरु झाल्यामुळे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले होते. मात्र संबंधीत डॉक्टरांना संशय आल्यामुळे त्याने स्वारातीच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवले होते.

    सदरील २८ वर्षीय तरुणाची वैद्यकीय महाविद्यालयाच्या पथकाने तपासणी करुन त्यास कोवीड केअर हाँस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्या स्वँबची तपासणी करण्यात आल्यानंतर तो पाँझिटीव्ह आल्यानंतर त्याचेवर उपचार सुरु करण्यात आले होते. दोन दिवसापुर्वी त्याची प्रकृती अत्यास्वस्थ झाल्यामुळे त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय टीम ने मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांचा आँनलाइन सल्ला घेवून उपचार सुरु ठेवले होते. मात्र उपचारास प्रतिसाद न देता त्याने आज सायंकाळी अखेरचा श्वास घेतला.

सदरील २८ वर्षीय रुग्णावर अंबाजोगाई नगर परीषदेच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सदरील तरुणाच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली असून त्यांचे समक्ष ठराविक अंतर ठेवून येथील बोरुळा तलाव स्मशानभूमीत त्याचे पार्थिवावर लगेचच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 उस्मानाबाद जिल्ह्यातील सदरील २८ वर्षीय रुग्ण पाँझिटीव्ह आल्यानंतर आनंदनगर विभागात राहणाऱ्या त्याच्या भावाच्या घरातील सदस्यांचे स्वँब घेवून तपासणी करण्यात आली होती. मात्र सदरील स्वँब निगेटीव्ह आढळून आल्याचे सांगण्यात येते.


अधिक माहिती: बीड

Related Posts you may like