भाजपच्या दोन आंदोलनाने कार्यकर्तेही संभ्रमात  धोंडे,धस गटांनी वेगवेगळ्या ठिकाणी ओतले दूध 

eReporter Web Team

शिरूर कासार (रिपोर्टर):- आज दूध दरवाढीसाठी भाजपच्या वतीने राज्य शासनाच्या विरोधात शिरूर कासार येथे जिजामाता चौकात धस गटाने तर कोळवाडी चौकात धोंडे गटाच्या कार्यकर्त्यांनी दूध रस्त्यावर ओतून राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देत आमच्यातही दुफळी असल्याची जाणीव करून करून दिल्याने कार्यकर्तेही संभ्रमात दिसले.
शेतकर्‍यांच्या गाईच्या दुधाला सरसकट प्रती लिटर १० रुपये अनुदान द्यावे, दूध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावे.या आणी इतर मागण्यासाठी भाजपच्या वतीने संपूर्ण राज्यभर महा एल्गार आंदोलन पुकारण्यात आलेले आहे.त्याचाच एक भाग 
म्हणून आज सकाळी ११:३० वाजता शिरूर कासार येथे जिजामाता चौकात आ.सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांनी तर माजी आ भीमराव धोंडे यांच्या कार्यकर्त्यांनी कोळवाडी चौकात असे दोन ठिकाणी दोन गटाचे आंदोलन करण्यात आले.दोन ठिकाणी झालेल्या आंदोलनावरून पुन्हा एकदा माजी आमदार व विधानपरिषदेचे विद्यमान आमदार यांचे गट आमने सामने आल्यामुळे पक्षा अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.राज्य स्तरावून प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप आणी महा युतीच्या वतीने एकत्रित आंदोलन छेडलेले असताना शिरूर कासारला मात्र दोन ठिकाणी झालेले आंदोलन मतदार संघातील अंतर्गत गटबाजी दाखवण्यासाठी पुरेशे आहे. भाजपच्या दोन ठिकाणी करण्यात आलेल्या आंदोलनामुळे भाजपात अंतर्गत बंडाळी असल्याची चर्चा दिवसभरात शहरात आणी तालुक्यात रंगली होती. 


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like