शेतकर्‍यांचा जनावरांचा संसार मोडकळीस आला, सावरण्यासाठी दुधाला दर वाढ द्या-आ.सुरेश धस 

eReporter Web Team

दुधाला दरवाढ द्या अन्यथा गुरांसह रस्त्यावर उतरू-भीमराव धोंडे 
आष्टी (रिपोर्टर):- लॉकडाऊनच्या काळात दुधाचे दर घसरल्याने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले असून दुग्धव्यवसाय पुर्णपणे मोडकळीस आला आहे. शेतकर्‍यांचा दुसरा कोणताही संसार उभा राहू शकतो परंतु जनावरांचा संसार पुन्हा उभा राहू शकत नाही म्हणून सरकारने दुधाला दर वाढ द्यावी असे मत आ.सुरेश धस यांनी महाएल्गार आंदोलन कडा येथे व्यक्त केले, त्यांनी मोफत दुध वाटप करुन सरकारचा निषेध केला. मा.आ.भीमराव धोंडे यांनी ही कडा येथे सुगंधी दुध वाटप करुन सरकारचा निषेध व्यक्त केला यावेळी बोलताना म्हणाले की संकटकाळात शेतकर्‍यांना सावरण्याची गरज असून राज्य सरकारने दुधाला दरवाढ न केल्यास गुरांसह रस्त्यावर उतरु अशा इशारा दिला.
आष्टी तालुक्यामध्ये आ. सुरेश धस मा.आ.भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली गावागावात मोफत दुध वाटप करण्यात आले.कडा येथे बोलताना आ.सुरेश धस म्हणाले की लॉकडाऊनच्या काळात दुग्धव्यावसायिकांना पशुखाद्य गायांना म्हशींना चारण्यापुरते सुद्धा दुधाचे पैसे येत नाहीत.


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like