आ.पवारांच्या मार्गदर्शनाखाली गेवराईत रस्ता रोको

eReporter Web Team

गेवराई (रिपोर्टर):- शेतकर्‍यांचा जोडधंदा असलेल्या दुधाला दरवाढ देऊन प्रती लिटरला १० रू. दराने तात्काळ अनुदान द्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र भाजपाच्या वतीने आज दि.१ ऑगस्ट रोजी राज्यभर अंदोलन करण्यात येत असून गेवराई येथे ही आ.लक्ष्मण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व  तालुकाअध्यक्ष प्रकाश सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील उमापूर, तलवडा, शिरसदेवी,पाडळसिंगी, येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 
यावेळी तालुका अध्यक्ष प्रकाश सुरवसे,किसान आघाडीचे ता.अध्यक्ष देविदास फलके, पं.स.सभापती प्रतिनिधी दिपक सुरवसे, ईश्वर पवार, विठ्ठल हात्ते, पं.स.सदस्य शाम कुंड, सरपंच महेश आहेर,रावसाहेब काळे, आदि उपस्थित होते. राज्यात आघाडीचे सरकार आले तेव्हा पासून अनेक प्रश्न ठप्प आहेत, त्यातच कोरोनो विषाणूने थैमान घातले आहे, त्यामुळे दररोज हजारो रूग्णांची संख्या वाढत आहे .तर या कोरोनाला रोखण्यातही आघाडी सरकारला अपयश आले आहे. गेली तीन-चार महिने लॉकडाऊन सुरू होता. अशा परिस्थितीत छोट्या मोठ्या व्यावसायिकांसह शेतकरी बांधवावर मोठे संकट ओढले आहे.त्यामुळे शेतक-यांचा जोडधंदा असलेल्या दुधाला वाढीव दर अनुदान तात्काळ द्यावे यासाठी राज्यभरात भाजपच्या वतीने आज हे अंदोलन करण्यात आले. दरम्यान गेवराई तालुक्यातही ठिकठिकाणी हे सोशल डिस्टन्सचे पालन करत हे आंदोलन करण्यात आले.


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like