दुध दरवाढीसाठी जिल्ह्यात भाजपाचे आंदोलन

eReporter Web Team

बीडमध्ये दुध रस्त्यावर फेकले; आष्टी,पाटोद्यात लोकांना दुध पाजले, गेेवराईत रस्ता रोको तर जिल्ह्याच्या अन्य ठिकाणी भाजपाचे आंदोलन
बीड,गेवराई,आष्टी,पाटोदा,शिरूर,केज,परळी | ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून
दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यात प्रति लीटर दहा रूपये अनुदान जमा करून दुध पावडर निर्यातीसाठी प्रति किलो ५० रूपये अनुदान देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी बीड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोनल करण्यात आले. बीडमध्ये जिल्हा भाजपाच्या वतीने रस्त्यावर दुध ओतून देण्यात आले एवढेच नव्हे तर महादेवाच्या वेशभुषेत असलेल्या व्यक्तीचा दुग्ध अभिषेक यावेळी घालण्यात आला. तर आष्टी, पाटोद्यात आ.सुरेश धसांनी लोकांना दुध पाजुन आंदोलन केले. गेवराईमध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर जिल्ह्याच्या अन्य ठिकाणी याच प्रमुख मागणीसाठी भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. या आंदोलना दरम्यान सोशल डिस्टन्सचा पुर्ण फज्जा उडाल्याचा दिसून आला तर जमावबंदीचे आदेश असतांना अनेक ठिकाणी पन्नास-शंभरपेक्षा अधिक भाजप कार्यकर्ते एकत्रित आल्याचे दिसून आले. 
दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यात प्रति लीटर दहा रूपये अनुदान जमा करून दुध पावडर निर्यातीसाठी प्रति किलो पन्नास रूपये अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी आज भाजपाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. बीड येथे ही जिल्हा भाजपाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुध ओतून राज्य सरकारचा निषेध केला. यावेळी आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या कार्यकाळात दुध उत्पादक संकटात सापडलेला आहे. अशा परिस्थितीत दुध उत्पादकांना प्रति लीटर दहा रूपयाचे अनुदान द्यावे तसेच दुध पावडर निर्यातीसाठी पन्नास रूपये द्यावे या मागणीसाठी भाजपाच्या वतीने आज आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी दुध ओतून राज्य सरकारचा निषेध केला. यावेळी आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी  यांना देण्यात आले.

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like