सततच्या पावसाने शिरूर तालुक्यात मुग पडला पिवळा कापसालाही लागले पाणी; तुरही खराब होवू लागली

eReporter Web Team

शिरूर कासार/ बीड (रिपोर्टर):-गेल्या आठ दिवसापासून तालुक्यात सतत पडणार्‍या पावसामुळे परिसरातील बहरात आलेला मूग पिवळा पडू लागला असून सततच्या पाण्यामुळे निचरा होत नसल्याने मुगालाही कावीळ झाल्याचे चित्र शिरूर कासार तालुक्यात पाहावयास मिळत आहे. शिरूर सह जिल्ह्यातल्या इतर ठिकाणीही अशीच परिस्थिती आहे. मुगासोबतच कापूस आणि तुरीलाही पाणी लागल्याने हे दोन्ही पिके अति पाण्यामुळे खराब होवू लागली आहेत. 
कधी नाही ते यंदा पावसाने बळीराजाच्या गरजेचे वेळेस पडून शेतकर्‍यांना दिलासा दिला असला तरी गेल्या आठ दिवसात नित्याने पडत असलेल्या पावसाने परिसरातील मुगाच्या पिकातुन पाण्याचा निचरा होत नसल्याने मूग पिवळे पडत असून असाच पाऊस सुरु राहिल्यास मुगा बरोबर तुर,उडीद,सोयाबीन पिवळे पडण्याची भीती व्यक्त होत आहे. शिरूर सह इतर तालुक्यातही अशाच प्रकारची परिस्थिती आहे. जून महिन्यापासून ते आजपर्यंत पाऊस पडत आला.  जास्त पावसामुळे खोलवट असलेल्या जमीनीत पाणी जमा होते आणि त्यामुळे त्याचा फटका पिकांना बसतो. (पान २ वर)
तसेच कापसाला जास्तीचे पाणी हानीकारक ठरत असल्याने या अतिरिक्त पावसामुळे अनेक ठिकाणचे कापसाचे पिक खराब होत असल्याचे दिसून येवू लागले. तुरीचीही तशीच अवस्था झाली आहे. निसर्गाने यंदा भरभरून साथ दिली असली तरी पिके मात्र जास्तीच्या पावसामुळे खराब होत असल्याने शेतकर्‍यांत पुन्हा चिंता व्यक्त केली जावू लागली आहे. 


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like