विना परवाना दूध आंदोलन केले भाजपा-शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर)ः-जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या लक्षणीय वाढत आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाच्यावतीने जमाव बंदीचा आदेश लागू केला आहे. सोशल डिस्टन्स पाळण्याबाबत वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र अशा बिकट परिस्थितीतही जमाव बंदीचे आदेश धुडकावून सोशल डिस्टन्सटचा फज्जा उडवत दुध दरवाढीचे कारण पुढे करत बीड जिल्हा भाजपाने आणि शिवसंग्रामने काल आंदोलन केले. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीसात या दोन्ही पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
काल भाजपा शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध करत दुध दरवाढीसाठी आंदोलन केले. मात्र हे आंदोलन करण्यापूर्वी त्यांनी मागीतलेली परवानगी पोलीसांनी नाकारली होती. शिवाय आंदोलनकर्त्यांनी कुठलेही सोशल डिस्टन्स न पाळता पाच पेक्षा जास्त लोकांनी हे आंदोलन केले. त्यामुळे शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पो.ना. भारत सानप यांच्या फिर्यादीवरुन शिवसंग्राचे जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, नवनाथ प्रभाळे, अनिल घुमरे, विजय सुपेकर, गणेश मोरे, मिरा डावकर, ज्ञानेश्‍वर कोकाटे, विजय सुपेकर, योगेश शेळके, दत्ता गायकवाड, राजेश माने, गणेश साबळे यांच्यासह दहा ते बारा  तर आशिष वडमारे यांच्या फिर्यादीवरुन भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, अशोक लोढा, भगीरथ बियाणी, डॉ.लक्ष्मण जाधव, नवनाथ शिराळे, श्रीकांत हजारी, प्रविण बांगर, महेश सावंत, शरद बडगे, फारुख शेख, सचीन उबाळे, संध्या राजपूत, संगिता धसे, छाया मिसाळ, लता राऊत, मिरा गांधले यांच्यासह दहा ते बारा जणांवर परवानगी नाकारली असतांनाही सामाजिक अंतर ठेवले नाही. व पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येवून हे आंदोलन केले त्यामुळे शिवाजी नगर पोलीसात कलम १८८,२६९, २७०भादवीनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like