मंत्रोच्चाराच्या गजरात राम मंदिराचे भूमिपूजन  अवघी अयोध्यानगरी सजली, कडेकोट बंदोबस्त

eReporter Web Team

दिल्ली (वृत्तसेवा)- बहुप्रतिक्षीत असलेल्या अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. राम मंदिर उभारणीसाठी हा नयन्यदिप सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून अवघी अयोध्या नगरी मोठ्या प्रमाणावर सजली होती. पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या अनुषंगाने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भूमिपूजन समयी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या वेळी उपस्थित होते. 
अयोध्येतल राम मंदिराचा निकाल न्यायालयाने दिल्यानंतर राम मंदिर उभारण्याची घोषणा करण्यात आली. आज दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून अयोध्या नगरीत विधीवत पुजा सुरू होती. बहुप्रतीक्षीत राम मंदिराच्या उभारणीसाठी देशातील हिंदू प्रतीक्षेत होते. आज सकाळी साडे अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत पोहचले. त्यांनी सर्वप्रथम हनुमानगढी येथे जाऊन अयोध्या नगरीचा पहरेदार हनुमानाचे दर्शन घेत अयोध्यानगरीत प्रवेशाची परवानगी घेतली. ही परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पारिजातकाचे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित होते. नंतर पंतप्रधान प्रमुख सोहळ्याकडे गेले. त्याठिकाणी प्रभू रामाचे दर्शन घेत मंत्रोच्चाराच्या गजरात  भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. 


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like