गेवराई शहरामध्ये ३७५ नागरिकांची अँटिजेन चाचणी

eReporter Web Team

गेवराई (रिपोर्टर) कोरोना सारख्या महामारीला रोखण्यासाठी शहरातील लहान मोठ्या व्यावसायिकांची प्रतिजन (अँटिजेन) चाचणी घेण्यासाठीचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढल्यानंतर आज गेवराई शहरात सहा ठिकाणी या चाचणीसाठी सेंटर सुरू करण्यात आले असून दुपारी १२:३० वा.पर्यंत सर्व सेंटरवर एकूण जवळपास ३७५ पेक्षा अधिक व्यावसायिकांचे नमुने घेण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. संजय कदम यांनी दिली आहे. 
 गेल्या काही दिवसांपासून गेवराई शहरासह तालुक्यात विविध भागात कोरोना रोगाचे रूग्ण आढळून आल्याने शहर व परिसरातील विविध भागात ३० जूलै पासून ६ ऑगस्ट पर्यंत पूर्ण पणे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी दि.५ व ६ या दोन दिवसात शहरातील व्यावसायिकांच्या प्रतिजन चाचणी बाबत आदेश काढले होते. या आदेशानुसार आज गेवराई शहरात नगरपरिषद कार्यालय, र.भ.अट्टल महाविद्यालय,नगर परिषद हॉल शिवाजी चौक,पंचायत समिती कार्यालय व कन्या प्रशाला आशा एकूण सहा ठिकाणी या तपासणीसाठी सेंटर नियुक्त करून तपासण्या सुरू करण्यात आल्या असून यात आज सकाळपासून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ३७५ अधिक व्यावसायिकांचे नमुने घेण्यात आले होते. या कामी तहसीलदार प्रशांत जाधवर,तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कदम, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉक्टर राजेश शिंदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चौबे यांच्यासह न.प. कर्मचारी, आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदवत परिश्रम घेत आहेत. तर या तपासणीसाठी व्यवसायिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत असल्याचे आरोग्य विभागाचे तालुका अधिकारी संजय कदम यांनी म्हटले आहे. 


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like