धक्कादायक ; गेवराईत 1310 दुकानदाराच्या कोरोना तपासण्या 28 पॉझिटिव्ह निघाले

eReporter Web Team

धक्कादायक ; गेवराईत 1310 दुकानदाराच्या कोरोना तपासण्या 28 पॉझिटिव्ह निघाले
गेवराई : रिपोर्टर
गेवराई शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी , बीड यांच्या आदेशानुसार गेवराई शहरातील सर्व व्यवसायीक व कामगार वर्ग यांची अॅन्टीजन तपासणी करण्याकरीता नियोजन करण्यात आलेले होते. सदर तपासणीकरता सहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली होती . त्यामध्ये १.जूनी नगर परिषद , बाजारतळ , गेवराई २.नगर परिषद कार्यालय , गेवराई . ३.नगर परिषद सभागृह गेवराई . ४. र.भ. अट्टल महाविद्यालय , गेवराई ५.जिल्हा परिषद कन्या प्रशाला , गेवराई व ६.पंचायत समिती गेवराई या ठिकाणांचा समावेश होता . सदर ठिकाणी प्रत्येकी एक वैद्यकीय अधिकारी , दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ , दोन डाटा एन्ट्री ऑपरेटर असे एकूण ३० कर्मचाऱ्यांचा समावेश होता . गेवराई शहरातील ६ तपासणी केंद्रावर १३१० व्यावसायिक , कामगार , सर्व प्रकारचे दुकानदार , फळ भाजी विक्रेते , दूध विक्रेते , पेट्रोल पंपावरील व बँकामधील कर्मचारी यांची कोविड -१ ९ निदानासाठी Antigen Test करण्यात आली . सदर तपासणीमध्ये २८ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळूल आले . लागण झालेल्या २८ नागरिकांना उपचाराकरीता हलविण्यात आले . सदर लोकांची तपासणी व निदान झाल्यामूळे इतर लोकांना होणारा प्रसार थांबविण्यात मदत होणार आहे . गेवराई शहरात एकाच दिवशी १३१० लोकांची Antigen Test करण्याची विशेष मोहिम श्री ढाकणे मुख्याधिकारी नगर परिषद , गेवराई , डॉ . संजय कदम , तालुका आरोग्य अधिकारी , तालुका गेवराई , डॉ.राजेश शिंदे , वैद्यकीय अधिक्षक , उपजिल्हा रुग्णालय , गेवराई , श्री विजयसिंह शिंदे , सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी , बीड यांनी यशस्वी केली . सदर मोहिमेला गेवराई शहरातील श्री . प्रतापराव खरात , अध्यक्ष व्यापारी महासंघ , श्री सुरेंद्र आप्पा रुकर , महासचिव , व्यापारी महासंघ , श्री संजय बरगे , उपाध्यक्ष व्यापारी महासंघ व सर्व प्रकारचे दुकानदार , फळ भाजी विक्रेते , दूध विक्रेते , पेट्रोल पंपचालक , इ . सर्व संघटनेच्या प्रतिनिधींनी याकामी मोलाचे सहकार्य करुन उत्सफूर्त प्रतिसाद नोंदविला 


अधिक माहिती: बीड

Related Posts you may like