पूर परिस्थिती बाबत गोदाकाठच्या नागरिकांसह अधिकारी कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे - आ.लक्ष्मण पवार

eReporter Web Team

आ.पवारांनी घेतला पूरपरिस्थिती बाबत आढावा
-----      
गेवराई (रिपोर्टर) पैठण येथील जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून या धरणाचे 18 दरवाजे खुले करून गोदापात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून पाण्याचा जोर वाढला तर अचानक पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यासाठी गोदाकाठच्या नागरिकांनी व संबंधित मंडळाधिकारी, तलाठी,ग्रामसेवक यांनी सतर्क राहावे असे आवाहन आ.लक्ष्मण पवार यांनी केले. 
 गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या अनेक गावात पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती असून याबाबत उपाययोजना करण्यासाठी आ.पवार यांनी आज तहसिल कार्यालयात बैठक घेऊन याबाबत आढावा घेतला. 
या बैठकीला आ.पावर यांच्यासह नायब तहसीलदार प्रशांत जाधवर,गटविकास अधिकारी सानप,नगरपरिषद मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्यासह गोदा पट्यातील सर्व तलाठी,मंडळाधिकारी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत गोदाकाठच्या अनेक गावचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत सतर्क राहावे असे आवाहन ही त्यांनी केले.


अधिक माहिती: बीड

Related Posts you may like