व्यापार्‍याकडून मुग, उडिदाची कवडी भावाने खरेदी

eReporter Web Team

जिल्ह्यात केंद्र सुरू करण्याची शेतकर्‍यांची मागणी 
बीड (रिपोर्टर)- राज्य सरकारने मुग, उडीद करेदीसाठी विविध जिल्ह्यात हमीभाव खरेदी केेंद्र सुरू केले मात्र बीड जिल्ह्यात अद्यापही खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकर्‍यांचा माल व्यापारी कवडीमोल भावाने खरेदी करत आहेत. याप्रकरणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष घालून तात्काळ हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे. 
  गेल्या काही दिवसांपासून मुग आणि उडीदाची खरेदी-विक्री सुरू आहे. राज्यात यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने खरीपाचे पीक जोमाने आले. त्यातच मुग आणि उडीदाचे उत्पन्न बर्‍यापैकी झाले. राज्य सरकारने राज्यातल्या विविध जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले मात्र जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने व्यापारी पाच ते साडेपाच हजारापर्यंत मुगाची खरेदी करत आहेत. शासनाचा हमीभाव सात हजार रुपये असल्याने खरेदी केंद्राअभावी शेतकर्‍यांची व्यापारी लूट करत असल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत लक्ष घालून तात्काळ हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे. 


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like