कोरोना गावागावात त्याला घरात येण्याअगोदर थांबवा

eReporter Web Team

बीड जिल्ह्यात ७ हजार ४१५ पॉझिटिव्ह रुग्ण दोन दिवसात आढळले ६१७ बाधीत
बीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात दाखल झालेला कोरोना आता गावागावात गेला असून तो प्रत्येक घरात येण्यास वेळ लागणार नाही. हा कोरोना रोखण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून आरोग्य विभाग जिल्ह्यातील मोठमोठ्या गावात अँटीजेन टेस्ट मोहीम राबवित आहे. या अँटीजेन आणि स्वॅबचे मिळून गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात ७१७ बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा आकडा ७ हजार ४१५ वर जावून पोहचला असून काल पाठवलेल्या स्वॅबचे अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे आता कोरोना गावागावात गेल्याचे सिद्ध झाले असून तो घरात येण्याअगोदर नागरिकांनी सतर्क होऊन त्याला दारातच रोखणे गरजेचे आहे. 
  कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पाऊले उचललेले होते तेव्हा सुरुवातीचे दोन महिने एकही पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता मात्र थोडीफार ढिल दिल्यानंतर कोरोनाने जिल्ह्यात घुसखोरी केली अन् बीडमधील नागरिकांनीही कोरोनाला सिरीयस न घेतल्याने आज जिल्ह्यातील गावागावात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत व त्याचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतोय. गेल्या दोन दिवसांपासून आरोग्य विभाग मोठमोठ्या गावात अँटीजेन टेस्ट मोहीम राबवत असून यामध्ये बाधीतांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येते. दोन दिवसात केलेल्या टेस्टमध्ये व पाठवलेल्या स्वॅबमध्ये ६१७ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर काही स्वॅबचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आजी सकाळपासून घेतलेले स्वॅब अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत तर विविध गावातही अँटीजेन टेस्टची मोहीम सुरुच आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत ७ हजार ४१५ बाधितांची नोंद जिल्ह्याच्या पोर्टलवर झाली असून त्यापैकी ४७२५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतलेले आहेत तर सध्या जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये २ हजार ४८८ जण उपचार घेत आहेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी बीड जिल्ह्यात २०२ तर बाहेर जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना पॉॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे यावर मात करणार्‍यांची संख्या देखील वाढत आहे.  आज १७७ जणांची सुट्टी होणार आहे. अँटीजेन टेस्ट मोहीम राबवल्यापासून आरोग्य विभागाने दोन वेळेस माध्यमांना कोरोनाच्या रिपोर्टची माहिती दिली. दि. १४ सप्टेंबर रोजी दिलेल्या माहितीनुसार ६ हजार ५५ जणांच्या अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये २२८ जण बाधीत आढळून आले तर काल १५ सप्टेंबर रोजी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य विभागाने ६ हजार ५५ अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये ४०४ बाधीत आढळून आले. मात्र या अहवालात १४ सप्टेंबरचे २२८ अँटीजेन टेस्टमधील पॉझिटिव्ह रुग्ण आहेत तर निगेटिव्ह एकूण ५ हजार ६५१ जण आले आहेत. त्यामुळे अजूनही काही रिपोर्ट येणे बाकी आहे. यावरून कोरोना आता गावागावात शिरला असून तो घरात येण्याअगोदर त्याला थांबवा अन्यथा जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाल्याशिवाय राहणार नाही. 


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like