ताजी बातमी बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात ३४२ पॉझीटीव्ह

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर): 
गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यात ऍन्टीजन टेस्टची मोहिम राबवण्यात येत असून आरोग्य विभागाला आज दि.१६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वा. १० मिनिटांनी ५०९२ संशयीतांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यामध्ये ३४२ जण पॉझीटीव्ह आढळले असून याच अहवालात दि.१५ सप्टेंबर रोजी केलेल्या ऍन्टीजन टेस्टमधील १७६ रुग्ण आहेत. तर ४७५० जण निगेटिव्ह आले आहेत. 
बीड जिल्ह्यातील ११ ही तालुक्यातील प्रमुख गावात संसर्ग झाला असून तो रोखण्यासाठी ऍन्टीजन टेस्टची मोहिम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. या टेस्टमध्ये शेकडोजण पॉझीटीव्ह आढळून येत आहेत. आज प्राप्त झालेल्या अहवालात एकूण ३४२ जण पॉझीटीव्ह आले आहेत. यामध्ये 
अंबाजोगाई -३४, 
आष्टी-१७, 
बीड -४१, 
धारूर -३३, 
गेवराई -३९, 
केज -२४, 
माजलगाव १३, 
परळी २७ , 
पाटोदा-२३, 
शिरूर ५६, 
वडवणी -३५ 
रुग्णांचा समावेश आहे. 


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like