ऊसतोड मजुरांना अडवल्याप्रकरणी आ. सुरेश धसांना अटक व सुटका

eReporter Web Team

आष्टी ( रिपोर्टर ) :-
आ. सुरेश धस यांनी ऊसतोड मजुरांना अडवल्याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर 341,34 भा.द.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्या जामिन  करण्याची प्रक्रिया झाल्यानंतर सोडण्यात आले. 
     ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर आ.सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली असून मागील आठवड्यात त्यांनी एका टॅक्टरमधून जाणार्‍या ऊसतोड कामगारांना विनंती करून घरी पाठवले होते.त्यानंतर बुधवारी एका टेम्पोतुन मजूर कारखान्याकडे जात असल्याचे आ.धस यांना समजताच त्यांनी मजुरांना आपल्या घरी जाण्याचे सांगितले.मात्र यावेळी पोलिसांनी मजुरांना अडवू नका अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करू असे सांगितल्यानंतर धस यांनी आक्रमक भूमिका घेत मजुरांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आपण एकही मजूर कारखान्याकडे जाऊ देणार नसल्याचे सांगितले.त्यामुळे आष्टी पोलीस ठाण्यात रियाज कलीम पठाण यांच्या फिर्यादीवरून धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन आष्टी पोलीस ठाण्यात स्वता:हुन जाऊन जामिन झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले
---
ऊसतोड मजुरांच्या न्यायमागण्यासाठी आमचे आंदोलन सुरू लोकनेते स्वं. गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या संघटनेतील तालुकाध्यक्ष इतरांनी ऊसतोड मजुरांच्या गाड्या अडवल्या होत्या मी हि गेलो तिथे आम्ही ऊसतोड मजुरांच्या न्याय हक्कासाठी लढत आहोत लढत असताना कुत्रे मांजरे भरतात त्या पद्धतीने एका आयशर मध्ये 100 माणसे टम्पो मध्ये 50 ऊसतोड मजूर गाडीमध्ये भरुन कारखान्यावाले घेऊन जात आहेत. आमचा संप मोडण्याचे हे षडयंत्र असून 100 गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरणार नाहीत 
    - आ. सुरेश धस


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like