शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालयात उद्या होणार ध्वजारोहन

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर):

उद्या १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. या निमित्ताने शाळा महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये सकाळी ८:३० किंवा ९:३० या दरम्यान ध्वजारोहन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ध्वजारोहनाच्या कार्यक्रमात मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. दि.१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असल्याने या दिनानिमित्त उद्या पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याहस्ते जिल्हाधिकारी येथे मुख्य ध्वजारोहनाचा कार्यक्रम पार पडणार आहे तसेच शासकीय निमशासकीय कार्यालये, संस्था, शाळा महाविद्यालयात सकाळी ८.३० पूर्वी किंवा ९.३० नंतर ध्वजारोहन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ध्वजारोहनाच्या कार्यक्रमादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like