किसान सभेची माजलगावात केंद्राविरोधात घोषणाबाजी

eReporter Web Team

नित्रुडमध्ये माजलगाव तेलगाव महामार्गा रास्ता रोको आंदोलनमाजलगाव (रिपोर्टर)- केंद्र सरकारने ५ जून रोजी जारी केलेले शेतकरीविरोधी विधेयके आणि वीज बिल कायद्यातील बदलाचे अध्यादेश   संसदेत पास केलेल्या आहेत .या नवीन बिलांना आणि विधेयकांना मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यासाठी २५ सप्टेंबरला देशव्यापी बंद आणि निषेध निदर्शनेची हाक अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितिच्या वतीने देण्यात आली होती.यायच एक भाग म्हणून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शारीरिक अंतर राखून आणि कोविड काळातील सर्व नियमांचे पालन करत नित्रुडमध्ये  माजलगाव तेलगाव महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकर्‍यानी कायदा नको स्वामिनाथन आयोग हवा अशी मागणी केली तसेच शेतकरी विरोधी विधयेकचा विरोधात जोरदार घोषणीबाजी करून परिसर दणानुन सोडले.
शेतकरी विरोधी तिन्ही विधेयक तात्काळ रद्द करा,नवीन वीज विधयेक २०२० आणि पर्यावरण संबधी अधिसूचना रद्द करा,अतिवर्ष्टिने पिकांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या,उसतोड़ कामगारांना दरवाढ देणारा नवीन करार करा,शेतकर्‍यांना विनाअट पिक कर्ज द्या,पेट्रोल डिझलची प्रचंड झालेली दरवाढ कमी करा,इत्यादी मागण्याचे निवेदन मंडळ अधिकारी पुराणिक यांना देण्यात आले.या वेळी कॉ सुभाष डाके, संदीपान तेलगड,सय्यद रज्जाक,जनक तेलगड,रामा राउत,बाबासाहेब डाके,अशोक तातोड़े,अड़ अशोक डाके,पोपट गायकवाड, पांडुरंग उबाळे,नारायण तातोडे, यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like