चले जाओ, चले जाओ नरेंद्र मोदी चले जाओ शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात जिल्ह्यात  शेतकरी संघटना संतप्त

eReporter Web Team

ठिकठिकाणी पंतप्रधानांचा धिक्कार, केज, माजलगाव, गेवराई, सिरसाळा, 
बीडसह अन्य तालुक्यात निदर्शने-रास्ता रोको 
बीड (रिपोर्टर)- केंद्र सरकारने शेतकरी विरोधी विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर केले. या विधेयकाचा सर्व स्तरातून जाहीर निषेध होत आहे. हे विधेयक शेतकर्‍यांसाठी जाचक ठरणार असून केेंद्र सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत असून हे बील रद्द करण्यात यावे या मागणीसाठी विविध डाव्या पक्षांच्या वतीने आज आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने झाली तसेच जिल्हाभरातील तालुका पातळीवर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. 

 गेल्या चार दिवसांपूर्वी केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करून घेतले. हे बिल शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करणारे ठरणार आहे. केंद्र सरकारला शेतकर्‍यांशी कसलेही देणेघेणे नाही. बिल तात्काळ रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी आज विविध डाव्या पक्षांसह शेतकरी संघटनेच्या वतीने देशभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. बीड येथेही आंदोलन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केेंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत बील परत घेण्याची मागणी केली. या वेळी अनेकांची उपस्थिती होती. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. तसेच तालुका पातळीवरही शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. केज, माजलगाव, गेवराई, परळी, अंबाजोगाई, आष्टी, पाटोदा यासह अन्य ठिकाणी आंदोलन झाले. 

केजमध्ये विधेयकाची केली होळी 
केंद्राने शेतकरी विधेयक आणले असून हे विधेयक अत्यंत जाचक आहे. यामुळे शेतकरी उद्वस्त होणार असून या विधेयकाची केज येथील शेकापने होळी करून केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला. 


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like