५ ऑक्टोंबरपासून हॉटेल, रेस्टॉरंटला परवानगी

eReporter Web Team

 


बीड (रिपोर्टर) कोरोनोचा संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंटवर पूर्णत:
बंद करण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसापासून नियम हळूहळू शिथील
केले जात आहेत. ५ ऑक्टोंबरपासून हॉटेल, फुड कोर्टस, रेस्टॉरंट आणि बार
सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
मार्च महिनयापासून देशात कोरोनाच्या संसर्गाला सुरूवात झाली होती.
तेव्हापासून लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. काही दिवसापून लॉकडाऊनच्या
नियमामध्ये बदल केले जावू लागले. हळूहळू व्यवहार सुरू करण्यात येत आहे.
आतापर्यंत हॉटेल, बियरबार, रेस्टॉरंट पूर्णत: बंद होते. राज्य सरकारने ५
ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट सुरू करण्याबाबत निर्ण घेतला असून ५ ऑक्टोबरपासून
सदरील रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टस, हॉटेल सुरू राहणार आहेत. तसे
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेशीत केले आहे. दरम्यान ५० टक्के
क्षमतेपर्यंत किंवा स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे बार
आणि रेस्टॉरंट सुरू राहणार आहेत.


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like