शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी पवार बांधावर उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी

eReporter Web Team

उस्मानाबाद (रिपोर्टर)-राज्यात परतीच्या पावसानं प्रचंड हाहाकार उडवला. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानं पिकांचं प्रचंड नुकसान झालं. अनेक शेतमाल पुरात वाहून गेला, तर शेतात उभी असलेली पिकं सडून गेली. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. पवार यांनी सकाळी तुळजापूर-परंडा तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली.
   बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुफान पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसामुळे हातचं पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला असून, शेतकर्‍याला दिलासा देण्याची मागणी विरोधकांसह विविध घटकांकडून केली जात आहे. राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात झालेल्या पिकांच्या नासाडी पाहणी करण्यासाठी शरद पवार दौरा करत असून, दौर्‍याची सुरूवात उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरपासून केली. तुळजापूरपासून गाडीतून काकांब्रा, लोहारा, सास्तुरा या गावांचा दौरा करत पवार पुढे रवाना झाले. यावेळी कांकाब्रा ते सास्तुरा गावांच्या दरम्यान शरद पवार यांनी गाडी थांबवून शेतकर्‍यांच्या व्यथा ऐकल्या. अनेक शेतकरी हातात भिजलेली पिकं घेऊन त्यांना दाखवत होती.


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like