आरटीओ कार्यालयाची दुरावस्था

eReporter Web Team

 उघडा पडलेला तो हौद जिवघेणा, किरायाच्या ईमारतीत कार्यालय चालवयाचे असेल तर किमान ईमारत 
तरी चांगली बघून घ्या,आरटीओ कार्यालय परिसरातील तो जनरेटर बंद की सुरू? लाखो रुपयाची विल्हेवाट
बीड (रिपोर्टर)ः-  गेल्या तिस वर्षापासून बीड आरटीओ कार्यालयाचे तिन भाड्याच्या ईमारतीत स्थलांतरन झालेले आहे. आपण पाहिले त्यावेळी सर्व प्रथम बार्शी रोडवरील भारत व्हिडीओ शेजारी आरटीओ कार्यालय होते. त्या कार्यालयाचीही अवस्था एवढी काही ठिक नव्हती. त्यानंतर बार्शी नाका परिसरात आरटीओ कार्यालय सुरू करण्यात आले. बाहेरुन भंगार दिसत असलेली इमारत आरटीओ प्रशासनाने भाड्याने घेतली. त्या इमारतीच्या आतिल भागात आरटीओ साहेब बसतील एवढीच एक खोली ठिकठाक होती. बाकी आतूनही हे कार्यालय काही ठिक नव्हते. त्यानंतर रहदारी वाढली आरटीओ कार्यालयाचे कामकाज वाढले. जागा पुरत नसल्याने पुन्हा आरटीओ कार्यालयाचे स्थलांतर झाले. यावेळी मात्र आरटीओ कर्मचार्‍यांनी घोसापूरी शिवारात आरटीओ कार्यालयासाठी जागा पाहिली. आणि पुर्वी बियरबार असलेल्या जागेत आरटीओ कार्यालय सुरू झालं. परंतू या कार्यालयातही एवढी काही सोय नसल्याने ते कार्यालयही दुरावस्थीत असल्याचे दिसून येेते. तब्बल तिस वर्षापासून आरटीओ कार्यालयाचा कारोबार भाड्याच्या ईमारतीत सुरू आहे. भाड्या पोटी आरटीओ प्रशासनाने कोट्यावधी रुपये भाडे दिले असतील. तर शेवटी सांगायचे तात्पर्य एवढेच की भाड्याच्या इमारतीत कार्यालय चालवयाचेच असेल तर किमान इमारत चांगली बघुन आरटीओ अधिकार्‍यांना शोभेल अशी इमारत भाड्याने घ्या. जेणेकरुन कर्मचारी व ग्राहक त्यांची सोय होईल. सध्या सुरू असलेल्या आरटीएो कार्यालयाची ईमारत बाहेरुन सुशोभीत दिसत असली तरी आत मधुन काही ग्राहकांनी व काही कर्मचार्‍यांनी  लाल करुन टाकली आहे. आरटीओ प्रशासनाने सध्या दुरावस्थेत असलेल्या कार्यालयाचे किमान देखभाल दुरूस्ती तरी करुन घ्यावी अशी अपेक्षा वाटत आहे.
आरटीओ कार्यालय परिसरात पाहणी केली असता परिसरात उघड्यावर पडलेले जनरेटर जे सुरू आहे की बंद याची माहिती मिळू शकली नाही. उन्हाळा असो पावसाळा असो हे जनरेटर वर्षाच्या बारा महिने अस्थव्यस्थ अवस्थेत पडून आहे. यावर प्रशासाने लाखो रुपये खर्च केले असेल परंतू होणारे नुकसान हे प्रशासनाचे आहे.म्हणूनच आरटीओ कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचारी याकडे लक्ष देतांना दिसत नाही. विशेष म्हणजे या जनरेटरमुळे शासनाला लाखो रुपयाचा भुर्दंड बसले असावे. आता प्रशासन जिम्मेदार आरटीओ कार्यालयातील कर्मचार्‍यांकडून या जनरेटरची झालेली नुकसान भरपाई करुन घेतील का? हा प्रश्‍न उपस्थित होत असून बाहेरुन सुशोभीत दिसणारी आरटीओ कार्यालयाची इमारत आतून भंगार अवस्थेत झालेली आहे. तसेच आरटीओ कार्यालयात कार्यालय परिसरात एक मोठे हौद आहे. बियर बार सुरू असतांना त्या हौदा शेजारी ग्राहक खुर्च्यां टाकून बसून इजॉय करत बसत असे आता तो हौद सडलेल्या पाण्याने भरुन आहे. त्या खड्याच्या शेजारुन दिवसभर ग्राहक ये-जा करतात. विशेष म्हणजे हौद आणि जमीन एक लेवल असल्याने कधीही दुर्घटना घडू शकते. किमान आरटीओ प्रशासनाने या हौदाची तरी व्यवस्था करावी जेणे करुन दुर्घटना घडणार नाही. 

आरटीओ कार्यालयाच्या 
कामाचे काय?
सुरूवातीला घोसापूरी शिवारात आरटीओ कार्यालय सुरू करण्यापुर्वी अशी चर्चा होती की, त्या परिसरातच आरटीओ कार्यालयाची आरक्षीत जागा आहे. तेथे नवीन इमारत तयार होणार आहे. असे म्हणता म्हणता अनेक वर्ष झाली. त्यानंतर नगर रोड मुर्शदपूर फाट्यापासून पाच कि.मी.अंतरावर आरटीओ कार्यालयाचे पासींग ट्रक तयार होत असल्याचे समजले. त्याठिकाणी भेट दिली असता. त्या ट्रॅकचे काय होईल ते होईल परंतू त्या ट्रॅक पर्यंत जाण्यासाठी ग्राहकांना रस्त्याअभावी मोठी कसरत करावी लागते. तसेच ज्याठिकाणी पासींग ट्रॅक तयार करण्यात आले. त्याठिकाणी काही अंतरावर आरटीओ कार्यालयाच्या इमारतीचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली. ते कामही सध्या बंद अवस्थेत दिसून येते. नेमके आरटीेओ कार्यालयाची इमारत कोठे होणार आणि आरटीओ कार्यालयाचे स्थलांतर स्वताःच्या इमारतीत रेल्वे येण्यापूर्वी झाले तरी योग्यच.


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like