लोकनेता शेतकर्‍यांचे अश्रू पुसायला बांधावर खचून जाऊ नका, मी तुमचा मुलगा नुकसान भरपाई  आणि जास्तीत जास्त पिक विमा मिळवून देणार -धनंजय मुंडे

eReporter Web Team

लोकनेता शेतकर्‍यांचे अश्रू पुसायला बांधावर
खचून जाऊ नका, मी तुमचा मुलगा नुकसान भरपाई 
आणि जास्तीत जास्त पिक विमा मिळवून देणार -धनंजय मुंडे
चिखल तुडवत ना.मुंडे मादळमोही, ईटकूर, हिरापूर, मिरकाळ्यात शेतकर्‍यांच्या बांधावर गेले
उपस्थित शेतकर्‍यांचे गार्‍हाणे ऐकले, शेतकर्‍यांना धीर देत हिम्मत दिली
काळजी करू नका, जास्तीत जास्त मदत मिळवून देतो 
लोकनेता शेतकर्‍यांचे अश्रू पुसायला बांधावर

खचून जाऊ नका, मी तुमचा मुलगा नुकसान भरपाई 
आणि जास्तीत जास्त पिक विमा मिळवून देणार -धनंजय मुंडे
चिखल तुडवत ना.मुंडे मादळमोही, ईटकूर, हिरापूर, मिरकाळ्यात शेतकर्‍यांच्या बांधावर गेले, उपस्थित शेतकर्‍यांचे गार्‍हाणे ऐकले, शेतकर्‍यांना धीर देत हिम्मत दिली, काळजी करू नका, जास्तीत जास्त मदत मिळवून देतो 

गेवराई (रिपोर्टर)- परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतातील पिकांची पाहणी करण्यासाठी आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी शेतातील चिखल तुडवत उपस्थित शेतकर्‍यांसोबत संवाद साधला. नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. जास्तीत जास्त पिक विमा कसा मिळेल याकडे लक्ष देण्यात येईल, असे आश्वासन देत उद्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा केली जाईल, असे सांगून मी तुमचा मुलगा आहे, तुम्ही आता शांत बसायचे, तुमच्या नुकसानीची जिम्मेदारी माझ्यावर असल्याचे सांगून उपस्थित शेतकर्‍यांना धिर दिला.
   आपल्या कर्तृत्व-कर्माने राज्यभर चर्चेत असलेले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी याची देही याची डोळा करण्यासाठी शेतकर्‍यांचे बांध गाठले. चिखल तुडवत धनंजय मुंडेंनी गेवराई तालुक्यातील १२ ठिकाणी पिकांची पाहणी केली. मादळमोही, हिरापूर, ईटकूर, मिरकाळा आदी भागात शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उभे पिक पाण्यात गेले. कापूस, तूरसह अन्य पिकं उद्ध्वस्त झाले. हाता तोंडाला आलेले पिक परतीच्या पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी चिंतातूर दिसून येत होता. अशा वेळी धनंजय मुंडेंनी शेतकर्‍यांना धिर दिला. जास्तीत जास्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिली जाईल, जास्तीत जास्त विमा मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगत धनंजय मुंडेंनी उपस्थित शेतकर्‍यांना काळजी करू नका, मी तुमचा मुलगा आहे, तुमच्या सोबत आहे. तुम्ही जे कष्ट केले आहे आणि त्या कष्टाचे चीज पावसाने हिरावून नेले ते मदतीच्या रुपाने विम्याच्या रुपाने तुम्हाला परत मिळवून देईल. तुम्हाला मदत मिळवून देणं हे माझं कर्तव्य असल्याचे सांगत उद्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये यावर चर्चा करण्यात येईल आणि तात्काळ मदत कशी मिळेल? याकडे लक्ष दिले जाईल, असे आश्‍वासन त्यांनी या वेळी दिले. 
   या दौर्‍यात ना.मुंडेंसोबत माजी आ. अमरसिंह पंडित, माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा कृषि अधिकारी निकम, तहसीलदार सचिन खाडे, प्रशांत जाधवर, तालुका कृषी अधिकारी सोनवणे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जगन्नाथ शिंदे, कुमारराव ढाकणे, कैलास नलावडे, राजेंद्र जरांगे, भाऊसाहेब माखे, बाबूराव काकडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. 
तुम्ही आराम करा, मी वार्‍या करतो 
मिरकाळ्यात एका शेतात वृद्ध दाम्पत्य ना. मुंडेंना भेटलं, ते दाम्पत्य म्हणालं औंदा मोठा पाऊस झाला, सगळं पिक पाण्यात गेलय, आतापर्यंत आम्ही पंढरपूरच्या वार्‍या करीत आलो, चारही धामला गेलो, परंतु देवानं यावर्षी शेतातलं पिक हिरावून घेतलं. यावर धनंजय मुंडेंनी ‘बाबा मी तुमचा मुलगा आहे, तुम्ही आता आराम करा, मी वार्‍या करतो’, तुमच्या वतीनेही आता मीच वार्‍या करणार आहे, असं म्हणून पुत्रत्वाचं कर्तव्य आणि पालकत्वाचं दातृत्व ना.मुंडेंनी यावेळी दाखवून दिलं. 


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like