जि.प.च्या आठ शाळा होणार आदर्श  राज्य शासन करणार शाळा विकसित

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर)-  जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी सरकारने राज्यात ३०० शाळांची निवड करून त्या आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यात बीड जिल्ह्यातील  ८ शाळांचा समावेश आहे . राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सोमवारी या बाबद परिपत्रक काढले. 
       यामध्ये मार्च २०२० मध्ये पार पडलेल्या राज्याच्या द्वितीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केल्यानुसार शालेय शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात राज्यात ३०० जिल्हा परिषद शाळा  आदर्श शाळा  म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. काही निकषांच्या आधारावर साधारणत : प्रत्येक तालुक्यातून १ अशा ३०० शाळा निवडण्यात आल्या आहेत. निवडलेल्या आदर्श शाळा शक्यतो किमान इयत्ता १ ली ते ७ वी वर्गाच्या जिल्हा परिषद शाळा असतील व गरज पडल्यास त्यात ८ वी चे वर्ग जोडण्यास वाव असेल. मात्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकात राज्यातील प्रत्येक तालुक्यातून एक आशा ३०० शाळा निवडण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.   या शाळेमध्ये स्वतंत्र शौचालय , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था , सुस्थितीत असलेले वर्ग , आकर्षक इमारत , क्रीडांगण , क्रीडा साहित्य , आयसीटी लॅब , सायन्स लॅब , सुसज्ज ग्रंथालय अशा  भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत . त्याचप्रमाणे आजूबाजूच्या गावांपासून व शाळांपासून दळणवळणासाठी रस्ते व भविष्यात विद्यार्थी संख्या वाढल्यास  इमारीत व भौतिक सुविधांचा  विस्तार करण्यासाठी पुरेसा वाव दिला जाणार आहे . जिल्ह्यातील आदर्श शाळेमध्ये  शैक्षणिक गुणवत्ता वाढीला अधिक महत्त्व दिले जाणार आहे . विद्यार्थ्यांना या शाळेत उत्तम शैक्षणिक पोषक वातावरण मिळावे , पाठ्यपुस्तकांपलीकडे जाऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे , विद्यार्थ्यांना लिहिता वाचता यावे , विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर भाषा व गणित विषयातील मूलभूत संकल्पना व त्याचे वाचन लेखन आणि गणिती क्रिया अवगत असाव्यात , शाळेच्या ग्रंथालयातील गोष्टींची पुस्तके  विद्यार्थ्यांनी वाचावेत , यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत .परंतु यात बीड जिल्ह्यात आठच तालुक्यातील आठ शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी समावेश करण्यात आला आहे . यात जिल्ह्यातील माजलगाव,परळी,वडवणी या तालुक्यातील शाळांचा समावेश करण्यात आला नाही.

शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होईल -मनोज जाधव
आदर्श शाळांच्या व्याख्येत शासनाने भौतिक सुविधा , शैक्षणिक गुणवत्ता आणि काही प्रशासकीय बाबींचा समावेश केला आहे .  पुस्तकाच्या पलीकडे जाऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवणे अपेक्षित आहे . विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर भाषा , गणित विषयातील मूलभूत संकल्पना , त्यात वाचन , लेखन , गणिती प्रक्रिया येणे अनिवार्य असेल . शाळेच्या ग्रंथालयामध्ये पूरक वाचन साहित्य , गोष्टीची पुस्तके , संदर्भ ग्रंथ , उपलब्ध असेल. स्वयंअध्ययना सोबत गट अध्ययना सारखे रचनात्मक पद्धतीचे शैक्षणिक कार्यक्रमही राबविण्यात येतील. या मुळे या शाळांची नक्कीच प्रगती हाईल. आणि  या आदर्श शाळांमधील प्रगती पाहून इतर शाळांमधील मुले हे जिल्हा परिषदेच्या शाळेत येथील.आणि जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची संख्या नक्कीच वाढेल असा विश्वास शिवसंग्रामचे नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी व्यक्त केला आहे.


आदर्श शाळांसाठी निवड झालेल्या तालुकानिहाय शाळा
१) आंबेजोगाई - जि.प.शाळा येलडा २) आष्टी - जि.प.शाळा पांग्रा ३) बीड  - जि.प.शाळा हिवरापहाडी ४)धारूर - जि.प.शाळा अमला ५)गेवराई - जि.प.शाळा अमला ६)केज - जि.प.शाळा बनकारंजा ७) पाटोदा - जि.प.शाळा पिंपळवंडी
८) शिरूर - जि.प.शाळा राक्षसभुवन


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like