परतीच्या पावसाने शेतातील पिक पाण्यात गेलं;  खळवट निमगावमध्ये शेतकर्‍याची आत्महत्या 

eReporter Web Team

वडवणी/बीड (रिपोर्टर):परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात धुमाकूळ घातला होता. या पावसाने खरिप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी अधिकच आर्थिक कोंडीत सापडला. यात अल्पभूधारक शेतकर्‍यांचे जास्तच मरण आले. शेतातील पिक पाण्यात गेले, आता काय करायचे या नैराश्यातून वडवणी तालुक्यातील खळवट निमगाव येथील ६० वर्षीय शेतकर्‍याने आंब्याच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. 
बाळासाहेब किसनराव अंभुळे (वय ६०) रा.खळवट निमगाव या शेतकर्‍यास दीड एक्कर शेती होती. शेतामध्ये त्यांनी पिकाची लागवड केल्यानंतर त्यास त्यांनी मोठ्या प्रमाणात खर्चही केला होता. मध्यंतरी परतीचा पाऊस बरसल्याने या पावसाने बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकर्‍याचे नुकसान झाले. तसे अंभुळे यांनी नुकसान झाल्याने त्यांचे सगळे पिक पाण्यात गेले.  या नैराश्यातून त्यांनी रात्री शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती वडवणी पोलीसांना कळवण्यात आल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. 

बीड जिल्ह्यात ४ लाख ३२ हजार ८८२ शेतकर्‍यांचे झाले नुकसान
परतीच्या पावसाने शेतकर्‍याचे नुकसान झाल्याने त्याचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर पंचनाम्याचा अहवाल विभागीय आयुक्ताकडे पाठवण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील ४ लाख ३२ हजार ८८२ शेतकर्‍यांचे नुकसान झाले असून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई राज्य सरकारने घोषीत केलेली आहे. जिल्ह्यासाठी २५५ कोटी ९५ लाख ३५ हजार रुपये मिळणार आहेत. 


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like