महसूल कर्मचारी संपावर, कामकाज ठप्प

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर)- औरंगाबाद विभागातील अनेक मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार यांचे चौकशी अहवाल रखडलेले आहेत. विभागातील शेकडो अधिकारी, कर्मचारी यांचे प्रमोशन रखडलेले आहेत. त्यामुळे चौकशी अहवाल तात्काळ पूर्ण करावेत, रखडलेले प्रमोशन तात्काळ देण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी औरंगाबाद विभागातील सर्वच महसूल कर्मचार्‍यांनी आज आणि उद्या दोन दिवसीय सामुहिक रजा आंदोलन पुकारलेले आहे. त्यामुळे आज बीड जिल्ह्यातील महसूल विभागाचे सर्वच कामकाज विस्कळीत झाले असून ग्रामीण भागातून आलेल्या लोकांचा हिरमुड झाला आहे. 
   औरंगाबाद विभागात गेल्या पाच वर्षांपासून मंडळ अधिकारी यांना नायब तहसीलदार, तहसीलदार या पदावर प्रमोशनने बढती दिली जाते. काही कर्मचार्‍यांच्या विभागातर्ंगत चौकशी सुरू आहे. या चौकश्या गेल्या पाच वर्षांपासून पुर्ण केलेल्या नाहीत, वैद्यकीय परिपुर्तीचे बिलही तात्काळ निघत नाहीत. यासह अनेक मागण्या औरंगाबाद विभागातील कर्मचार्‍यांच्या आहेत. नागपूर, कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्र या विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचार्‍यांना प्रमोशन दिले आहेत. मात्र बीड जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांच्यावर अन्याय कशामुळे? अनेक कर्मचारी प्रमोशनला पात्र असूनही त्यांचे प्रमोशन होत नसल्यामुळे ते सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेले आहेत. यासह इतर बाबी अनेक वेळा विभागीय आयुक्तांच्या कानावर घातलेल्या आहेत. मात्र विभागीय आयुक्त, विभागातील सर्व जिल्हाधिकारी या कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे जाणुनबुजून दुर्लक्ष करतात. त्यामुळे आज औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालय, विभातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये या विभागातील मंडल अधिकारी, अव्वल कारकून, नायब तहसीलदार हे आज आणि उद्या दोन दिवसांच्या सामुहिक रजा आंदोलन करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आपल्या कामानिमित्त आलेल्या नागरिकांचा हिरमुड झालेला दिसून आला. तर महसूल विभागाचे सर्वच कामकाज विस्कळीत झाले आहे. बीड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. त्या निवेदनावर राज्याचे कोषाध्यक्ष सुहास हजारे, अध्यक्ष चंद्रकांत जोगदंड, सरचिटणीस महादेव चौरे, राहूल शेटे, आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. 


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like