ताज्या बातम्या

कोडीन स्ट्राईक 

काट्याकुपाट्यात दडले होते कोडीन ड्रग्जचे रहस्य 

       दहशतवादी कारवाया, स्त्रीभु्रण हत्या ते चांद्रयान अभियान निमित्त कोणतेही असो बीड मात्र राज्यातच नव्हे तर देशात चर्चेत असतो. चांद्रयान अभियानामुळे आता तर चक्क बीडचे नाव जगभर प्रसिद्ध झाले. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचाच नव्हे तर कलाकारांचाही जिल्हा आहे. परंतू आर्थिक विवंचनेतून अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. आपल्यात कलाकारी असतांनाही किंवा इतर काही गुण असूनही आपल्याला पुढे जाता आले नाही. या खंतमुळे तो व्यक्ती नशेकडे वळतो. शेवटी या नशेमुळे संसारासह स्वत:चे जीवनही उद्ध्वस्त होते. दारू, गांजा, चरस, अफीम, ब्राऊन शुगर हे नाव परिचीत आहेत. परंतू या पलीकडेही जावून नशेखोर (ड्रगिस्ट) कधी कोणत्या पदार्थापासून किंवा वस्तूपासून नशा करतील याचे काही सांगता येत नाही. म्हणूनच दै.रिपोर्टरच्या प्रतिनिधीने काट्या कुपाट्यात जावून सर्व्हेक्षण केले. या सर्व्हेक्षणात जिल्ह्याचे भयान वास्तव समोर आले. एवढेच नव्हे तर बातमी छापण्यापूर्वीच औषध प्रशासन विभागाने दखल घेत हिमाचलप्रदेश औषध आयुक्त यांना पत्र देवून यासर्व बाबीची माहिती मागितली असून एकंदरीत खोकल्यासाठी वापरात येणार्‍या कोडीनयुक्त औषधांचा नशेसाठी वापर होत असल्याचे समोर आले असून जर वैद्यकीय अधिकारी यांच्या परवानगीशिवाय कोडीनयुक्त औषध विक्री करता येत नसतांनाही एवढ्या मोठ्या प्रमाणात कोडीनयुक्त औषधांच्या बाटल्या काट्या कुपाट्यात आल्या कोठून? या काट्या कुपाट्यात दडले होते कोडीनयुक्त ड्रग्जचे रहस्य. ड्रग्जच्या नशेत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत असून नशेसाठी कॉस्मेटीक वस्तूंचा वापर होत असल्याचेेही दिसून येत आहे.

   गेल्या दोन महिन्यापासून दै.रिपोर्टरचे प्रतिनिधी यांनी एक अगळे-वेगळे शोध सुरू केले होते. यात शहरातील विविध ठिकाणी एकांत जागेवर हमखास काही तरी औषधाच्या रिकाम्या बाटल्या दिसून येत असे. बाटल्या रिकाम्या असल्याने कोणाचेही लक्ष त्या बाटल्याकडे जाणार नाही आणि त्या बाटल्या रिकाम्या कशाच्या आहेत? कोठुन आल्या? या बाटल्यात कोणते औषध आहे? या औषधाचा वापर कोणत्या आजारासाठी होतो? असे अनेक प्रश्‍न असतात. परंतु पाहणार्‍यांना या सर्व बाबींशी काही घेणं-देणंं नसते. परंतू या छोट्याशा प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष दिल्यानंतर बीड शहरातील अनेक ठिकाणी अशा रिकाम्या बाटल्या ज्या बाटल्या खोकल्याच्या औषधाच्या असून या औषधात कोडीन मिश्रीत आहे. हमखास कोडीन युक्त औषधाचा वापर नशेसाठी होत असल्याने राज्य शासनाने कोडीनयुक्त औषध डॉक्टरांच्या परवानगीशिवाय कोणत्याही औषध दुकानदाराने विक्री करू नये अशी सक्त ताकीद आहे. कोडीनयुक्त औषधाची एकही बाटली ऑनलाईनशिवाय विक्री करता येत नाही. अशी सक्ती असतांनाही एवढ्या मोठ्या प्रमाणात कोडीनयुक्त औषधाच्या रिकाम्या बाटल्या शहरातील विविध ठिकाणी कशा आढळून येतात? ही अत्यंत गंभीर बाब असल्याने लक्ष दिल्यानंतर या काट्याकुपाट्यात आढळून येणार्‍या रिकाम्या कोडीनयुक्त औषधाचे संबंध थेट बीड ते हिमाचलप्रदेश असल्याचे दिसून येत असल्याने अन्न औषध प्रशासनाचे ड्रग्ज इन्स्पेक्टर आर.बी.डोईफोडे यांनी क्षणाचाही विलंब न करता रिपोर्टरच्या बातमीची दखल घेत थेट हिमाचलप्रदेश येथून उत्पादीत झालेल्या या औषधाची विक्री महाराष्ट्रात झाली का? याची माहिती मागितली असून या प्रकरणाचे धागेदोरे की मोठ-मोठे सोल असल्याचे समोर येतीलच.

खाजगी वाहनाने होत असावी तस्करी 
कोडीनयुक्त औषध डॉक्टरांच्या परवानगीशिवाय विकता येत नाही. म्हणून अनेक औषध विक्रेते डॉक्टरांची चिठ्ठी पाहुणच औषध विक्री करतात. जर बीड शहरातील औषध दुकानावरून या रिकाम्या झालेल्या कोडीनयुक्त औषधाची विक्री झाली नसेल तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणात औषधाच्या रिकाम्या बाटल्या आल्या कोठून? अन्न औषध प्रशासनाचे लक्ष औषध दुकाने असतात, जर इतर दुसर्‍या ठिकाणावरून या औषधाची विक्री होत असेल, इतर जिल्ह्यातून किंवा इतर राज्यातून या औषधांची खासगी वाहन किंवा रेल्वे माध्यम, ज्या जिल्ह्यात उपलब्ध असेल त्या जिल्ह्यातून सोपे जसे वाटले तशा पद्धतीने तर या कोडीनयुक्त औषधाची तस्करी होत असल्याची चर्चा आहे. 

रिपोर्टरच्या सर्व्हेक्षणानंतर हिमाचल आयुक्तांना पत्र 
शहरातील विविध ठिकाणी एकांत जागेवर कोडीनयुक्त औषधाच्या बाटल्या किंवा इतर रिकाम्या झालेल्या गोळ्यांचे पाकीटे हे जागोजागी दिसून येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर रिपोर्टरने एक अगळे वेगळे सर्व्हेक्षण सुरू केले. या सर्व्हेक्षणात काट्याकुपाट्यात जावून माहिती गोळा करावी लागली. यात ज्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या त्या रिकाम्या बाटल्यावरील पत्त्यावरून सदरील औषध हिमाचल प्रदेश येथे उत्पादीत झाले. मग हे औषध बीडपर्यंत कसे आले? म्हणून अन्न औषध प्रशासनाने रिपोर्टरच्या सर्व्हेक्षणाची दखल घेत थेट हिमाचल प्रदेश औषध आयुक्त यांना पत्र लिहून कळविले की, सदरील रिकाम्या बाटल्या मोठ्या प्रमाणात बीड शहरात आढळून आलेल्या आहेत. औषध तयार करणार्‍या कंपनीने सदरील औषधाची एजन्सी बीड जिल्ह्यात कोणाला दिलेली आहे? त्याची माहिती किंवा बीड शहरात आढळून आलेल्या रिकाम्या बाटल्या नेमक्या कशा इतपर्यंत पोहोचल्या याची संबंधित कंपनीशी चौकशी करून अहवाल द्यावा असे पत्र दिल्याने बीड ते हिमाचल प्रदेश कनेक्शन नेमके कसे आहे याचा खुलासा होईल

नशेपासून तरूणाई मुक्त होईल
ड्रग्ज घेणारे तरूण मुले वाम मार्गाला लागून विविध प्रकारचा नशा करतात. हमखास असे निदर्शनास आले की, औषध दुकानासह कॉस्मेटीक दुकानावरूनही विविध प्रकारचे वस्तूपासून नशा करण्यासाठी मिळणारे वस्तू खरेदी करतात. अत्यंत सहजपणे आणि कमी पैशात हा नशा उपलब्ध होतो म्हणून तरूणाई याच्याकडे जास्ती प्रमाणात जातांना दिसून येते. अशा प्रकारचा नशा करणार्‍या मुलांना प्रेम मिळाल्याशिवाय या चक्रव्युहमधून बाहेर पडणे शक्य नसते. नशा केल्यानंतर हे मुले हमखास स्वत:ला नुकसान करून घेतात. म्हणून त्यांच्याकडे पाहणारे त्यांना घाबरतात आणि त्यांच्यापासून आपण दूर जातो. म्हणूनच पालकांनी किंवा सामजसेवकांनी अशा मुलांचा तिरस्कार करण्यापेक्षा त्यांना अपुलकीने उपचार केले तर नक्कीच या नशेपासून तरूणाई मुक्त होईल यात काही शंका नाही. पालकांनीही आपल्या मुला संदर्भात संयम बाळगावा. हा नशा सोडणे शक्य आहे फक्त प्रेमाची या मुलांना गरज आहे. 

बातमीपुर्वीच इम्पॅक्ट तरी पाठपुरावा सुरू

शहरात अनेक ठिकाणी तरूण मुले विविध प्रकारचा नशा करतांना दिसतात. परंतू या मुलांना या नशेपासून मुक्ती कशी होणार याचा विचार कोणीच करत नाही. जर ड्रग्ज मिळाले नाही तर तरूण मुले या नशेतून मुक्त होतील. म्हणून दै.रिपोर्टरने ग्राऊंट रिपोर्टींग आधारे ड्रग्जमुक्ती अभियान राबविण्यासाठी पुढाकार घेतला. यात औषधापासून ते कॉस्मेटीग वस्तुपासून नशा करतांना तरूण मुले दिसून आली. यात कोडीनपासून नशा करणार्‍यांची संख्या जास्त आहे. रिपोर्टच्या प्रतिनिधीने काट्या कुपाट्यात जाऊन नशेसाठी वापरण्यात येणार्‍या रिकाम्या औषधाच्या बाटल्याचा शोध घेवून सदरील बाटल्या अन्न औषध प्रशासनाच्या स्वाधीन केले. अशा प्रकारे अन्न औषध प्रशासनाचे ड्रग्ज इन्स्पेक्टर आर.बी.डोईफोडे यांनी क्षणाचाही विलंब न करता रिपोर्टरच्या सर्व्हेक्षणाची दखल घेत रिकाम्या बाटल्या ज्या राज्यात तयार झाल्या, ज्या कंपनीत तयार झाल्या याची चौकशी करण्यासाठी हिमाचलप्रदेश औषध आयुक्त यांना पत्र देवून प्रकरणाचा खुलासा मागितला. अशा प्रकारे बातमीपुर्वीच इम्पॅक्ट आला परंतू या तरूणांना या नशेपासून मुक्त करण्यासाठी दै.रिपोर्टर सदैव तत्पर राहणार आणि हा पाठपुरावा पुढे ही सुरू राहणार यात काही शंका नाही. 

दै.रिपोर्टरच्या सर्व्हेक्षणात भयान वास्तव समोर मेडिकलवाले आणि सुटकेचा श्‍वास

 शहरातील अनेक ठिकाणी कोडीनयुक्त औषधाच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्यानंतर आम्ही विविध औषध दुकानावर जावून पाठपुरावा केला. परंतू अनेक मेडिकलवाल्यांनी असे सांगितले की, अशात ड्रग्ज घेणारे मुले दुकानावर येत नाहीत. पुर्वी सारखे औषध द्या म्हणून आम्हाला परेशान करायचे. परंतू अशात ते ड्रग्जच्या गोळ्या किंवा कोडीनयुक्त औषध मागणीसाठी दुकानावर येत नाहीत. या लोकांची गर्दी कमी झाली म्हणून आम्ही सुटकेचा श्‍वास सोडला. जर औषध दुकानावर कोडीनयुक्त औषध मिळत
 नसेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात

समासेवकांनी पुढाकार घ्यावा
अनेक ठिकाणी तरूण मुले व्यसनाधिन होत चाललेली आहे. या तरूणांना कार्य शाळेच्या माध्यमाने या ड्रग्ज नावाच्या कीडपासून मुक्त करणे अत्यंत गरजेचे आहे. औषध, गोळ्यापासून नशा करणार्‍या तरूणांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. शहरातील किंवा आपआपल्या जिल्ह्यातील सर्व समाजसेवकांनी अशा तरूणांना भरकटलेल्या मार्गावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच महाराष्ट्र ड्रग्जमुक्त होईल यात काही शंका नाही. मात्र समाजसेवकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. 
 कोडीनयुक्त औषधाच्या रिकाम्या
 बाटल्या आल्या कोठून? 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review