
मुंबई - आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री श्रीदेवी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुबईत रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास निधन झाले.
चंदेरी दुनियेत गेली अनेक दशके लुकलुकणारी "चाँदनी" 54 व्या वर्षी अचानक लुप्त पावल्याने तिच्या लाखो चाहत्याना मोठा धक्का बसला आहे.
तामिळनाडुतील सिवाकासी येथे 13 ऑगस्ट 1963 रोजी श्रीदेवी हिचा जन्म झाला होता. वयाच्या चौथ्या वर्षीच तिने "थुनाईवन" या चित्रपटाद्वारे अभिनयाचा "श्रीगणेशा" केला. त्यानंतर अनेक वर्ष तेलगु, तामिळ, मल्याळम व कन्नड चित्रपटात तिने बाल कलाकार म्हणुन काम केले. तर बॉलीवुडमध्येही 1975 मध्ये आलेल्या "ज्युली" चित्रपटात तिला बाल कलाकार म्हणुन काम करण्याची संधी मिळाली.1976 मध्ये आलेल्या "मोंदुरु मूडुचु" या तामिळ चित्रपटात वयाच्या 13 व्या वर्षी मुख्य नायिकेचे पात्र साकारता आले.
अधिक माहिती: Bollywood