मानवी तस्करी प्रकरणात दलेर मेहंदीला २ वर्षे तुरुंगवास

eReporter Web Team

पतियाळा(वृत्तसेवा)  प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीला २००३ मधील मानवी तस्करी प्रकरणात पंजाबमधील एका स्थानिक न्यायालयानं दोषी ठरवलं असून, दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दलेर मेहंदीचा भाऊ शमशेर सिंग यालाही या प्रकरणात दोषी ठरवलं आहे. सध्या दलेर पंजाब पोलिसांच्या कोठडीत आहे. 

वृत्तानुसार, अवैधरित्या लोकांना विदेशात पाठवल्याप्रकरणी दलेर मेहंदी आणि शमशेर सिंग या दोघांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. १९९८ आणि १९९९ या कालावधीत या दोघांनी १० जणांना अवैधपणे अमेरिकेला पाठवले होते. त्यासाठी त्यांच्याकडून पैसेही घेतले होते. या प्रकरणी दोघांविरोधात २००३ मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. दलेरने १९९८ आणि १९९९ मध्ये अमेरिकेत शो केले होते. टीममधील १० सदस्यांना अमेरिकेत सोडून भारतात परतला होता. त्याचवेळी एका नायिकेसोबत अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या दलेरनं आपल्या टीममधील तीन मुलींना सॅन फ्रान्सिस्कोमध्ये सोडलं होतं


अधिक माहिती: bollywood

Related Posts you may like