बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं!

eReporter Web Team

 बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं!
विमानात  67 प्रवाशांचा सामावेश  
 काठमांडू 
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये बांगलादेशच्या यूएस-बांग्ला या खासगी प्रवासी विमानाला अपघात झाला असून . त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रनवेवर उतरताना हे  विमान  कोसळलं.
लँडिगच्या वेळी विमान रनवेच्या बाजूने झुकलं आणि तेव्हाच त्यात आग लागली. यानंतर ते जवळच्या फुटबॉल ग्राऊंडमध्ये पडलं. स्थानिक मीडियानुसार, सोमवारी दुपारी हा अपघात झाला. विमान ढाक्याहून काठमांडूला येत होतं. हे विमान दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी लँड करणार होतं. विमान कोसळलं त्यावेळी त्यात 67 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते, असं विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 17 जखमींना आतापर्यंत वाचवण्यात आलं असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. नेपाळी सैन्याकडूनही बचाव कार्य सुरु आहे, असं पर्यटन मंत्रालयाचे सचिव सुरेश आचार्य यांनी सांगितलं. तांत्रिक बिघाडामुळे विमानाचा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. दुर्घटनेनंतर विमानतळ बंद करण्यात आलं आहे`


अधिक माहिती: kathmandu

Related Posts you may like