शिवसेनेच्या पसं सदस्य पूजा मोरे यांचा स्वाभिमानी शेतकरी 'संघटनेत' प्रवेश 

eReporter Web Team

कोल्हापूर :-

   शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी गेवराई शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्या पूजा मोरे यांनी आज कोल्हापूर (जयसिंगपूर) येथे खा.राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश केला. फक्त शेतकरी प्रश्नांची बांधिलकी म्हणून संघटनेत त्या काम करणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणारे एक व्यासपीठ म्हणून त्या फक्त संघटनेचे काम करणार आहेत. राजकीयदृष्ट्या त्या शिवसेना पक्षातच सक्रिय असतील असे त्यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले. 

सायं दै बीड रिपोर्टरचे गेवराई प्रतिनिधी भागवत जाधव यांच्याशी बोलताना त्यांनी पुढील प्रतिक्रिया दिली:-
'मी शिवसेनेची पंचायत समिती सदस्य आहे. मी आजही शिवसेनेत आहे,  उद्याही शिवसेनेत असेल. शिवसेना ही माझी राजकीय भुमिका आहे. तर स्वाभीमानी शेतकरी संघटना ही माझी शेतकर्‍यांच्या प्रश्नांविषयीची भुमिका आहे. मी स्वाभीमानी संघटनेच्या विचाराला मान्य केलंय. पक्षाच्या नाही. या सर्वांच्या आधी मी एक शेतकरी कन्या आहे. आणि शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवायचा असेल तर कुठल्या तरी चळवळीसोबत काम करावं लागेल. स्वाभीमानी संघटना शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चळवळ करणारी आहे. आज घडीला महाराष्ट्रात ऊस दर, कापूस दर आणि शेती मालाचा उत्पादन खर्चावर आधारीत 50 टक्के नफा हे प्रश्न खूप मोठे आहेत. ते प्रश्न सोडविण्यासाठी  काम करणार आहे.

 


अधिक माहिती: gewarai

Related Posts you may like