मी शेतकर्‍याचा मुलगा आहे, बैलगाडी कशी चालवायची मला नका सांगू! -धनंजय मुंडे

eReporter Web Team

धनंजय मुंडे जेव्हा बैलगाडी हाकतात
मी शेतकर्‍याचा मुलगा आहे, बैलगाडी कशी चालवायची मला नका सांगू!
खेड ( रिपोर्टर):- अरे मी शेतकर्‍याचा मुलगा आहे , बैलगाडी चालवणे हा लहानपणी माझा आवडता छंद आहे, बैलगाडी कशी चालवायची हे मला नका सांगू असे म्हणत आज विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज परिवर्तन संकल्प यात्रेदरम्यानच्या मिरवणुकीत आपल्या नेत्यांचे सारथ्य केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या दुसर्‍या दिवशीच्या सुरुवातीच्या सभेआधी खेड येथे सर्व नेत्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढली. विधान परिषदेचे विरोध पक्षनेते ना. धनंजय मुंडेंनी ही बैलगाडी चालवली.  मुंडेंनी सारथ्य केलेल्या बैलगाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते अजितदादा पवार, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, आ. संजय कदम आदी होते.
या दरम्यान बैलगाडीत बाजूला बसलेला गाडीवानाला गर्दीत बैलगाडी नियंत्रित होत नसल्याचे लक्षात आले, तो मुंडे यांना साहेब मी चालवू का म्हणाला त्यावर धनंजय मुंडे यांनी अहो मी शेतकर्‍याचा मुलगा आहे, बैलगाडी कशी चालवायची हे मला चांगले येते असे म्हणत  तिच्यावर नियंत्रित करत सभास्थळा पर्यन्त घेऊन गेले.  उपस्थित पत्रकारांच्या नजरेतून ही गोष्ट चुकली असेल तर नवलच. मुंडे यांच्या या उत्तराला उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like