ताज्या बातम्या

धनंजय मुंडे म्हणाले - पंकजाबरोबर काम करणार पण ....... 

पुणे ऑनलाईन रिपोर्टर 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करण्याची तयारी दाखवली आहे. मुख्यमंत्र्यांनी एखादी संस्था मराठवाड्यात आणावी, ऊसतोड कामगारांचे प्रश्न, पाणीप्रश्न मार्गी लावावे, मग आम्ही दोघे मिळून कोणाशीही भांडू, असे आव्हान त्यांनी दिले.
 युवा नेते तथा  मराठवाडा प्रोफेशनल क्लबचे संस्थापक विशाल कदम यांनी चहापान आणि थेट संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.मी त्यांच्याबरोबर कोणत्याही मंचावर एकत्र येण्यास तयार आहे. पण सरकारने नागपुरात नेलेली 'आयआयएम' मराठवाड्यात आणावी, मराठवाड्याच्या हक्काचे पाणी द्यावे आणि ऊसतोड कामगारांचा प्रश्न मार्गी लावावा, असे आव्हान मुंडे यांनी दिले. ऊसतोड कामगारांना दिल्या जाणाऱ्या मजुरीत वाढ करण्याचा निर्णय यापूर्वी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार घेत होते. मात्र आता ऊसतोड कामगारांचे प्रश्न माहित नसलेले लोक लवादाचे प्रमुख झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.सत्ताधाऱ्यांची मानसिकता केवळ विदर्भाचा विकास करणारी आहे. मात्र विदर्भासोबत मराठवाड्याचाही विकास झाला पाहिजे. मराठवाड्यात औद्योगिक विकास झाला पाहिजे. रेल्वे सुविधा, पिण्याचे आणि शेतीचे पाणी याबाबत मराठवाडा स्वावलंबी झाला पाहिजे. मराठवाड्यासह विविध भागांतील विद्यार्थ्यांना राहण्यासाठी पुरेशी वसतिगृहे बांधली पाहिजेत, आदी मागण्या आगामी हिवाळी अधिवेशनात करणार आहे. तसेच मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे, असेही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमासाठी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील पुण्यात स्थायिक झालेले विशाल कदम यांचा मित्र परिवार निवडक व्यावसायिक, उद्योजक, लेखक, पत्रकार, वकील, इंजिनियर, डॉक्टर, विद्यार्थी उपस्थित होते. अनेक प्रश्न धनंजय मुंडे यांना विचारण्यात आले सखोल अशी मराठवाड्याचा अनुषंगाने चर्चा झाली. मंचावर विठ्ठल कदम, खुणे पाटील उपस्थित होते.


मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी युवकांनी पुढे यावे - विशाल कदम 
मराठवाड्याच्या अनुशेषा बाबतीत सरकार उदासीन असून आता युवकांनी मिळून सिंचन, दळणवळण, विजेसाठी व उद्योग व्यवसाय निर्माण करण्यासाठी संघर्ष करण्यास सज्ज होण्याचे आवाहन  मराठवाडा प्रोफेशनल क्लबचे संस्थापक विशाल कदम यांनी यावेळी केले. 

अधिक माहिती: DhananjayMunde

Best Reader's Review