...तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश!-तेलंगणा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव

eReporter Web Team


नवी दिल्ली (वृत्तसंस्था):  देशातील 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश कोरोना संक्रमणाच्या प्रभावाखाली आहेत. संक्रमितांची संख्या बुधवारी सकाळी 567 झाली असून आतापर्यंत 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूच्या मदुराईमध्ये सकाळी 54 वर्षीय संक्रमित रुग्णाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या सर्वात जास्त 109 केस केरळमध्ये असून महाराष्ट्र 101 संख्येने दुसर्‍या क्रमांकावर आहे. या दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी जनतेला लॉकडाउनचे उल्लंघन न करण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेत यासाठी सेना बोलावण्यात आली होती, आपल्याकडेही परिस्थिती नियंत्रणात आली नाही आणि नियम तोडताना कोणी दिसल्यास गोळी मारण्याचे आदेश द्यावे लागू शकतात. लॉकडाऊन आणि कर्फ्यू लागू करण्यासाठी पोलीस सतर्क आहेत. गृहमंत्रालयानुसार लॉकडाऊन तोडणार्‍यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like