महाराष्ट्रात नवे २९४० करोना रुग्ण, ६३ मृत्यू, संख्येने ओलांडला ४४ हजारांचा टप्पा

eReporter Web Team

 

बीड -ऑनलाईन रिपोर्टर 

महाराष्ट्रात २९४० नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या आता ४४ हजार ५८२ झाली आहे. आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन महाराष्ट्रात १५१७ झाली आहे.गेल्या २४ तासांमध्ये ८५७ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात १२ हजार ५८३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली 

राज्यात आज 2940 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 44582अशी झाली आहे. आज नवीन 857 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 12583 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 30474 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत 

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ६३ मृत्यू करोनामुळे झाले आहेत. त्यापैकी २७ मृत्यू मुंबईत, पुण्यात ९, जळगावमध्ये ८, सोलापुरात ५, वसई विरारमध्ये ३, औरंगाबादमध्ये ३, साताऱ्यात २, मालेगावात १, ठाण्यात १, कल्याण डोंबिवलीत १, उल्हासनगरमध्ये १, पनवेलमध्ये १, नागपूर शहरात १ मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या ६३ मृत्यूंपैकी ३७ पुरुष तर २६ महिला आहेत. आज झालेल्या ६३ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरच्या वयाचे २८ रुग्णा होते. तर ३१ रुग्ण हे ४० ते ५९ वर्षे या वयोगटातले होते. ४ जणांचे वय ४० वर्षांखालील होते. ६३ मृत्यूंपैकी ४६ जणांना मध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय रोग हे गंभीर आजार होते.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ३ लाख ३२ हजार ७७७ रुग्णांपैकी २ लाख ८८ हजार १९५ जणांचे नमुने करोनासाठी निगेटिव्ह आले आहेत. तर ४४ हजार ५८२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ६९ हजार २७५ जण होम क्वारंटाइन आहेत. तर २८ हजार ४३० लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like