ताजी बातमी – देशात 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढला; काय सुरु राहणार, काय बंद जाणून घ्या; बीड रिपोर्टर

eReporter Web Team

 

नवी दिल्ली. देश आता अनलॉक होणार आहे. सरकारने यासाठी शनिवारी नवी गाइडलाइन जारी केली. याअंतर्गत 8 जूननंतर अटी आणि शर्तींसह हॉटेल, रेस्तराँ, शॉपिंग मॉल्स आणि धार्मिक स्थळे सुरू होणार आहेत. देशभरात फक्त कंटेनमेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. संपूर्ण देशबरात रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत कर्फ्यू राहील. शाळा-महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय जुलैमध्येच होणार आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणे आणि सामान्य लोकांसाठी सिनेमा हॉलसारखी ठिकाणं सुरू करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. दरम्यान महाराष्ट्र सरकार सध्या केंद्राच्या नवीन गाइडलाइनचा अभ्यास करत आहे. त्यानुसार, 31 तारखेला राज्य सरकारकडून गाइडलाइन जारी केले जाऊ शकतात.

मुख्य गोष्टी –

  • लॉकडाऊन -5 ला अनलॉक -1 असे नाव देण्यात आले आहे.
  • हॉटेल आणि रेस्टॉरंट 8 जूनपासून सुरू होतील.
  • 30 जूनपर्यंत रात्री कर्फ्यू सुरु राहणार.
  • 8 जूनपासून अटींसह धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी.
  • सामाजिक कार्यक्रमांवर निर्बंध कायम राहतील
  • 8 जूनपासून शॉपिंग मॉल्स सुरू होतील.
  • जुलैमध्ये सिनेमागृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
  • शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय जुलैमध्ये घेण्यात येईल.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची बंदी कायम राहील. पान, गुटखा आणि दारू पिण्यास सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंध कायम.
  • कंटेनमेंट झोनमध्ये केवळ आवश्यक सेवांना परवानगी असेल.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like