पेट्रोल-डिझेल महागले ; जाणून घ्या काय असतील नवीन दर

eReporter Web Team

तब्बल अडीच महिन्यांनंतर पेट्रोलिअम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे कच्च्या तेलाचे दरही ४० डॉलर्स प्रति बॅरलच्या वर गेले आहेत. दरम्यान, पेट्रोलिअम कंपन्यांनी यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउनच्या कालावधीत पेट्रोलिअम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ दरात कोणताही बदल केला नव्हता. १६ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अखेरचा बदल करण्यात आला.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल ८० दिवसांनी ६० पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी काही राज्य सरकारांनी महसूलात वाढ करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरी वॅट अथवा सेसच्या दरात बदल केले होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तर मे महिन्यात केंद्र सरकारनं पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोलवरी उत्पादन शुल्क वाढून २२.९८ रूपये प्रति लीटक आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढून १८.८३ रूपये प्रति लीटर करण्यात आले होते. उत्पादन शुल्क वाढवण्यात आल्यानं कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीचा फायदा मिळाला नव्हता. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कच्च्या तेलाच्या होणाऱ्या दरातील बदलांवर निश्चित केले जातात. कारण भारतात तब्बल ८० टक्के कच्च्या तेलाची आयात केली जाते.


अधिक माहिती: Uddhav Thackeray

Related Posts you may like