३० नोव्हेंबर पर्यंत ८० कोटी भारतीयांना मोफत धान्य देणार – मोदी

eReporter Web Team

३० नोव्हेंबर पर्यंत ८० कोटी भारतीयांना मोफत धान्य देणार – मोदी

ऑनलाईन रिपोर्टर 

३० नोव्हेंबरपर्यंत गरीबांना धान्य मोफत दिलं जाणार आहे अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. याचा लाभ देशातल्या ८० कोटी जनतेला होणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही लवकरच लागू केली जाणार आहे अशीही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. जे करदाते आहेत त्यांना मी अभिवादन करतो त्यांनी प्रामाणिकपणे त्यांचा कर भरला त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो असंही मोदींनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी आज कोरोना काळात देशाला सहाव्यांदा संबोधित केले. यावेळी मोदींनी गरीब कुटुंबासाठी महत्वपूर्ण घोषणा केली. कोरोना काळात सुरू करण्यात आलेली गरीब कल्याण अन्न योजना आता दिवाळी आणि छठ म्हणजे नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. याअंतर्गत, गरीब कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सरकार 5 किलो गहू किंवा 5 किलो तांदूळ मोफत देईल. यासह प्रत्येक कुटुंबाला दरमहा एक किलो दाळ देखील मोफत देण्यात येणार आहे.

अनलॉकमध्ये निष्काळजीपणा वाढतोय 

मोदी म्हणाले की, जगाच्या तुलनेत कोरोनाच्या बाबतीत भारत स्थिर स्थितीत आहे, परंतु अनलॉकमध्ये निष्काळजीपणा वाढत आहे. लॉकडाउन प्रमाणेच लोकांनी दक्षता दर्शविली पाहिजे. नियम न पाळणाऱ्यांना समजावणे आवश्यक आहे. 


कंटेनमेंट झोनकडे बरेच लक्ष देणे आवश्यक 

पंतप्रधान म्हणाले की आपण 6 फुटांचे अंतर, वीस सेकंदाच्या हात धुण्याबाबत काळजी घेतली आहे. आज जेव्हा आपल्याला अधिक सतर्कतेची आवश्यकता आहे, तेव्हा वाढती लापरवाही मोठे चिंतेचे कारण आहे. लॉकडाउनमध्ये नियमांचे गंभीरपणे पालन करण्यात आले. आता स्थानिक नागरिक संस्था, देशातील नागरिकांना सरकारांनी तीच दक्षता दाखवण्याची गरज आहे. कंटेनमेंट झोनकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नियम न पाळणाऱ्यांना समजावणे आवश्यक आहे. 

सरपंच किंवा पंतप्रधान कोणीही नियमांपेक्षा मोठा नाही

पंतप्रधान म्हणाले की, एका देशाच्या पंतप्रधानांना मास्क न घातल्याप्रकरणी 13 हजाराचा दंड ठोठावण्यात आला अशी बातमी आपण वाचली किंवा पाहिली असेल. भारतातही स्थानिक प्रशासनाने अशाप्रकारे काम केले पाहिजे. ही 130 भारतीयांच्या सुरक्षेची मोहीम आहे. गाव प्रमुख किंवा देशाचे पंतप्रधान, कोणीही नियमांपेक्षा मोठा नाही.

पंतप्रधान मोदींचे कोरोना काळात आत्तापर्यंत केलेले संबोधन 

  • पहिले संबोधन - 19 मार्च: जनता कर्फ्यूची घोषणा 
  • दुसरे संबोधन - 24 मार्च: 21 दिवसांचा लॉकडाउन 
  • तिसरे संबोधन - 3 एप्रिल: दिप प्रज्वलीत करण्याचे आवाहन 
  • चौथे संबोधन - 14 एप्रिल : लॉकडाउन-2 ची घोषणा
  • पाचवे संबोधन - 12 मे : 20 लाख कोटीच्या आर्थिक पॅकेजची आणि लॉकडाउन 4.0 का घोषणा

अधिक माहिती: pankaja munde narendr modi

Related Posts you may like