आधी अडवलं ,गचूर धरलं ,खाली पाडलं योगी सरकारच्या पोलिसांनी राहुल गांधींना अटक केलं

eReporter Web Team

आधी अडवलं ,गचूर धरलं ,खाली पाडलं योगी सरकारच्या 
पोलिसांनी राहुल गांधींना अटक केलं 

ऑनलाईन  रिपोर्टर 

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. पोलिसांची गाडी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना घेऊन घटनास्थळावरुन रवाना झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. काँग्रेसकडून पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी योगी आदित्यनाथ यांना कशाची भीती वाटत आहे अशी विचारणा प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.

याआधी उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसमधील बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी जात असताना पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी चालत निघाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं. पोलिसांनी लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडलं असं राहुल गांधींनी सांगितलं.

राहुल गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पोलिसांकडून मला धक्काबुक्की करण्यात आली. लाठीचार्ज करुन मला खाली पाडलं. फक्त मोदीच या देशात चालू शकतात का ? सर्वसामान्य व्यक्तीला ही परवानगी नाही का ? आमचं वाहन थांबवण्यात आलं म्हणूनच चालत निघालो होतो”.राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही योगी आदित्यनाथ सरकारवर हल्लाबोल केला आहे

राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना सोबत देण्यासाठी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान हाथरस जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू आहेत. तर सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like