लिमरा सिटीझनवर सिकंदर क्लबचा ६ गडी राखून विजय; सामनावीर ठरला लक्ष्मीकांत

eReporter Web Team


बीड (रिपोर्टर): रिपोर्टर आयोजित टी-१० लेदर बॉल क्रिकेट चषक स्पर्धेच्या पाचव्या दिवशीचा दुसरा सामना लिमरा सिटीझन क्लाऊड बीड विरूद्ध सिकंदर क्रिकेट क्लब बीड असा खेळवण्यात आला. उद्योगपती दिलीप धूत व भाजपा युवा नेते अमोल तरटे यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. सदरची नाणेफेक ही लिमरा सिटीझन क्लाऊडने जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ९ षटक आणि पाच चेंडूत लिमरा सिटीझनचा अख्खा संघ तंबूत परतून ७५ धावा काढत सिकंदर क्रिकेट क्लब समोर विजयासाठी ७६ धावांचे आव्हान उभे केले. सिकंदर क्लबने अवघ्या ७ षटक आणि तीन चेंडूत हे आव्हान पार करत सहा गडी राखून लिमरा सिटीझनवर विजय मिळवला.
श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर गेल्या पाच दिवसांपासून रिपोर्टर आयोजित टी-१० लेदर बॉल क्रिकेट चषकात राज्यासह राज्याबाहेरून आलेल्या खेळाडूंचा खेळ पाहण्याचा मनसोक्त आनंद बीड शहरासह जिल्हाभरातील क्रिकेट चाहते घेत आहेत. काल स्पर्धेच्या पाचव्या दिवशी दुसरा सामना हा लिमरा सिटीझन क्लाऊड विरूद्ध सिकंदर क्रिकेट क्लब बीड असा झाला. लिमरा सिटीझनचे कर्णधार आणि सिकंदर क्रिकेट क्लबचे कर्णधार यांना सोबत घेऊन उद्योगपती दिलीप धूत आणि भाजपा युवा नेते अमोल तरटे यांच्या हस्ते मैदानात नाणेफेक करण्यात आली. ही नाणेफेक लिमरा सिटीझन क्लाऊड संघाने जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल. मैदानात उतरलेले लिमरा सिटीझनचे फलंदाज सिकंदर क्रिकेट क्लबच्या गोलंदाजासमोर जास्त काळ टिकू शकले नाहीत. लिमराच्या सय्यद अझीम याची फलंदाजी वगळता अन्य कुठल्याही फलंदाजाला मनावा तसा सूर सापडला नाही. सय्यद अझीमने अवघ्या सहा चेंडूत तीन षटकार मारत २१ धावा केल्या तर सय्यद मुलबेर या लिमराच्या खेळाडूने सात चेंडूत २ चौकार लगावत १३ धावा केल्या. तेव्हा कुठं लिमरा संघाला ९ षटक आणि ५ चेंडूत ७५ धावा काढता आल्या. अवघा संघ दहा षटकेही खेळू शकला नाही. सिकंदर क्लब समोर विजयासाठी ७६ धावांचे आव्हान होते. हे आव्हान सिकंदर क्लबने स्विकारले आणि सलामी फलंदाज मैदानात उतरविले. लिमरा सियीझन संघाच्या गोलंदाजांना खेळवत ठेवत सिकंदर क्लबच्या फलंदाजांनी ७५ धावांचं आव्हान पेलवण्याचा निर्णय घेतला. सिकंदर क्लबचा लक्ष्मीकांत या फलंदाजाने तर अवघ्या १९ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकार लगावत ३९ धावा केल्या. सिकंदर संघाने अवघ्या ७ षटके ३ चेंडूत ५ गडी खर्ची करत ७६ धावा काढत लिमरा सिटीझनवर ६ गडी राखून विजय मिळवा.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like