मुंबईच्या संघाची पुण्याच्या संघावर २७ धावांनी मात

eReporter Web Team


बीड (रिपोर्टर): सिकंदर क्लब बीड आणि आदर्श क्लब बीडच्या रंगतदार सामन्यानंतर सहाव्या दिवसातल्या तिसरा सामना हा प्रदीप स्पोर्ट मुंबई आणि बीएम क्लब पुणे यांच्यात ठेवण्यात आला. या सामन्याची नाणेफेक दैनिक झुंजार नेताचे संपादक अजीत वरपे  यांच्या हस्ते करण्यात आला. ही नाणेफेक प्रदीप स्पोर्ट मुंबई यांनी जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात १० षटकात प्रदीप स्पोर्टने ४ गडी बाद १२६ धावांचं आव्हान  बीएम क्लबसमोर ठेवले. १२६ धावांचा पाठलाग करताना बीएम क्लब पुणे १० षटकात ९९ धावाच काढू शकली त्यामुळे तब्बल २७ धावांनी प्रदीप स्पोर्ट मुंबईचा दणदणीत विजय झाल. 
दुपारचा सामना अत्यंत रंगतदार झाल्यामुळे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर क्रिकेट चाहत्यांची बहूगर्दी शेवटच्या सामन्यापर्यंत होती. जेव्हा तिसर्‍या सामन्यासाठी प्रदीप स्पोर्ट मुंबई संघाचे कर्णधार अमित कदम आणि बीएम क्लब पुणे संघाचे कर्णधार कुलदीप कावीताके यांना मैदानात घेवून झुंजार नेताचे संपादक अजीत वरपे नाणेफेक केली. या सामन्याची नाणेफेक प्रदीप स्पोर्ट मुंबई यांनी जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मैदानात उतरलेले प्रदीप संघाचे फलंदाज बीएम क्लब पुणे संघाच्या गोलंदाजावर अक्षरश: तुटून पडले. या संघाचा सचिन गिल या फलंदाजाने ३८ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकार लगावत अर्धशतक केव्हाच पार केलं  आणि शतकी खेळीकडे त्याने वाटचाल केली. शेवटी तो ८० धावात बाद झाला. २० धावांनी सचिन गिलचे शतक हुकले. या स्पर्धेत सचिन हा सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज ठरला. सरशेवटी प्रदीप स्पोर्टने दहा षटकात ४ बाद १२६ धावांचा डोंगर बीएम क्लब पुणे समोर ठेवला. १२६ धावांचा पाठलाग करण्यासाठी बीएम क्लबचे फलंदाज मैदानात उतरले त्यांनीही सुरूवातीला चांगली लढत दिली. बीएम क्लबचे फलंदाज यश यादव याने १८ चेंडूत ५ चौकार १ षटकार लगावत ३२ धावा काढल्या तर अजिंक्य बेलूसे या फलंदाजाने २३ चेंडूत ३ चौकार १ षटकार लगावत ३२ धावा काढून आपल्या संघाची धावसंख्या वाढती ठेवली मात्र त्यानंतर बीएम क्लबच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक तंबूत परतावे लागले. १० षटकामध्ये ४ गडी बाद होत बीएम क्लब अवघ्या ९९ धावा काढू शकला. त्यामुळे प्रदीप स्पोर्ट मुंबईने २७ धावांनी जिंकला. या सामन्याचा सामनावीर ८० धावा काढणारा प्रदीप स्पोर्ट मुंबईचा फलंदाज सचिन गिल ठरला. सचिनला माजलगाव नगर पालिकेचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like