निजामाबादच्या नईम ११ ला मुंबईच्या प्रदीप स्पोर्टने हरवलं

eReporter Web Team


६२ धावा काढणारा सौरवभ जगदाळे ठरला सामनावीर
बीड (रिपोर्टर): रिपोर्टर आयोजित टी-१० लेदर बॉल क्रिकेट चषक स्पर्धेच्या सातव्या दिवसी पहिला सामना प्रदीप स्पोर्ट मुंबई विरूद्ध नईम ११ निजामाबाद असा खेळवण्यात आला. या सामन्याची नाणेफेक ऍड.उज्ज्वला भोपळे मॅडम यांनी यांच्या उपस्थितीत झाली. या सामन्याची नाणेफेक मुंबईच्या प्रदीप स्पोर्टने जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ७ बाद ९९ धावांचे आव्हान निजामाबादच्या नईम संघासमोर ठेवण्यात आले. या धावांचा पाठलाग करताना ९२ धावातच निजामाबाद नईमचा संघ ९ षटक आणि ३ चेंडूत तंबूत परतला. या सामन्यात ११ धावांनी मुंबईच्या प्रदीप स्पोर्टने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यातील सामनावीर प्रदीप स्पोर्ट मुंबईचा फलंदाज सौरभ जगदाळे हा ठरला. त्याने अर्धशतकी खेळी खेळत ६२ धावा केल्या. 
गेल्या आठ दिवसांपासून बीडच्या श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर रिपोर्टर-टी-१० लेदर बॉल क्रिकेट चषक सुरू असून जिल्हाभरात या चषकातील क्रिकेट सामने पाहण्यासाठी चाहत्यांचा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित लावत आहे. कालही तीन सामन्यात थरारक खेळ चाहत्यांना पाहावयास मिळाला. सातव्या दिवशीच्या पहिल्या सामना प्रदीप स्पोर्ट मुंबई विरूद्ध नईम ११ निजामाबाद असा खेळवण्यात आला. ऍड.उज्ज्वला भोपळे यांच्या उपस्थितीत प्रदीप स्पोर्टचे कर्णधार अमित कदम आणि नईम ११ चे कर्णधार सय्यद नईम यांनी नाणेफेक केली. ही नाणेफेक प्रदीप स्पोर्ट मुंबई यांनी जिंकून  प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीचे फलंदाज मैदानात उतरले आणि त्यांनी धावांची जमवाजमव करण्यात सुरूवात केली. संथ गतीने धावा चालू असतांना या संघाचा अष्टपैलू खेळाडू सौरभ जगदाळे मैदानात उतरला. त्याने नईम ११ संघाच्या गोलंदाजावर तुटून पडणे पसंत केले. १४ चेंडूत ७ चौकार ३ षटकार लगावत अर्धशतकी खेळी करून ६२ धावा काढल्या तर याच संघाचा सचिन गिल याने ९ चेंडूत ३ चौकार लगावत १८ धावा काढून संघाची धावसंख्या मजबूत केली.  १० शतकात ७ बाद ९९ धावांचं आव्हान प्रदीप स्पोर्टने नईम ११ समोर ठेवले. ९९ धावांचा पाठलाग करण्यासाठी निजामाबाद नईम ११ संघाचे फलंदाज मैदानात उतरले. मात्र या संघाचा योगेश चौधरी या फलंदाजाव्यतिरिक्त अन्य कुठल्याही फलंदाजाला सूर सापडला नाही. योगेशने अवघ्या १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार लगावत ३६ धावा काढल्यामुळे निजामाबाद नईम संघाची धावसंख्या मजबूत होत गेली. मात्र धावपट्टीवर फलंदाज प्रदीप स्पोर्ट मुंबईच्या गोलंदाजासमोर टिकत नव्हते. सरशेवटी ९ षटक आणि तीन चेंडूत निजामाबादचा नईम ११ संघ तंबूत परतला. त्यामुळे प्रदीप स्पोर्ट मुंबईचा ७ धावांनी दणदणीत विजय झाला. या सामन्यात प्रदीप स्पोर्टचा फलंदाज सौरभ जगदाळे हा सामनावीर ठरला. बीड नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्या हस्ते त्याला रिपोर्टर ट्रॉफी देत सन्मानित करण्यात आले. 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like