इएमआय संघापुढे बीड शेकापने नांगी  टाकली 

eReporter Web Team


इएमआय संघाचा थरारक विजय 
बीड (रिपोर्टर): स्पर्धेच्या सातव्या दिवशी पहिल्या दोन सामन्यात औरंगाबादच्या दोन संघाने दबदबा निर्माण केल्यानंतर तिसरा सामना हा इएमआय स्पोर्ट औरंगाबाद विरूद्ध एसकेपी बीड असा झाला. या सामन्याची नाणेफेक दै.लोकाशाचे संपादक विजयराज बंब यांच्या उपस्थितीत करण्यात आली. ही नाणेफेक बीडचा एसकेपी संघाने जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असता १० षटकात ८ गडी बाद ८९ धावांचं आव्हान इएमआय औरंगाबाद संघासमोर ठेवण्यात आलं. औरंगाबादच्या इएमआय संघाने हे आव्हान स्विकारत ६ गडी राखून एसकेपी संघावर दणदणीत विजय मिळवला. हा सामना पाहण्यासाठी बीड शहरातून हजारोच्या संख्येने क्रिकेट चाहते मैदानाच्या गॅलरीत उपस्थित होते. 
सातव्या दिवसातला शेवटचा सामना हा बीडचा एसकेपी आणि औरंगाबादचा इएमआय हे दोन्हीही तुल्यबळ संघ लढणार असल्याने हा सामना पाहण्यासाठी मैदानात चाहत्यांची तोबा गर्दी होती. एसकेपी बीड संघाचे कर्णधार सय्यद शाकेर आणि इएमआय स्पोर्ट औरंगाबाद संघाचे कर्णधार मुनीर गाझी यांना मैदानात घेवून दै.लोकाशाचे संपादक विजयराज बंब यांनी नाणेफेक केली. ही नाणेफेक बीडच्या एसकेपीने जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. १० षटकामध्ये ८ बाद ८९ धावा एसकेपी संघाने काढल्या. एसकेपी मधील फलंदाज या सामन्यात जास्त काळ धाव पट्टीवर टिकू शकले नाहीत. मात्र कुशवाह अंकीत या फलंदाजाने १९ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार लगावत एसकेपीला ३१ धावांचं बळ दिलं. सरशेवटी ८९ धावांचं आव्हानाचा पाठलाग करताना औरंगाबाद इएमआय संघाचे फलंदाज मैदानात उतरले. त्यांनी एसकेपी गोलंदाजांवर तुटून पडणे पसंत केले. मुजतबा खान या फलंदाजाने २२ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकार लगावत ३६ धावा आपल्या संघाला दिल्या तर खालेद कादरी या फलंदाजाने २१ चेंडूत ३ चौकार २ षटकार लगावत २८ धावा काढून संघाची धावसंख्या आणखी मजबूत केली. १० षटकात ४ बाद ९२ धावा औरंगाबादच्या इएमआय संघाने काढून बीडच्या एसकेपी संघावर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्याचा सामनावीर औरंगाबाद इएमआय संघाचा गोलंदाज सय्यद समीयोद्दीन ठरला. त्याला बीडचे पोलीस उपअधिक्षक सुधीर खिरडकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like